जबलपूर, 28 मार्च : लॉकडाऊन असूनही हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कॉंग्रेसच्या नेत्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं आहे. मृत नेता हा माजी नगरसेवकही होता. खुनाच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. हत्येचे कारण परस्पर शत्रुत्व असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे जबलपूरमध्येही पोलीस दक्ष आहेत. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात संपूर्ण प्रशासनही सहभागी आहे. परंतु यावेळी हनुमंतल भागात काँग्रेसचे नेते व राधा कृष्णा प्रभागचे माजी नगरसेवक धर्मेंद्र सोनकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ज्याने हत्या केली त्याने धमेंद्र यांच्यावर चार वेळा गोळीबार केला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मोनू सोनकर असे आहे. धर्मेंद्र यांना ठार मारल्यानंतर आरोपीने स्व:त पोलिसांत जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. त्याने स्वतः पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि सांगितले की धर्मेंद्र यांची हत्या करून तो आला आहे. यापूर्वीही मोनूने हत्येची घटना घडवून आणली होती. यावेळी तो जामिनावर तुरूंगातून बाहेर होता.
असे सांगितले जात आहे की धर्मेंद्र सोनकर दुपारी त्यांच्या घरासमोर मंदिराशेजारी आपल्या एका साथीदारासमवेत बसले होते, त्यावेळी परिसरातील कुख्यात बदमाश मोनू सोनकर आपल्या साथीदारांसह आला आणि त्याने गोळ्या झाडून पळून गेला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे धर्मेंद्र स्वत:ला वाचवण्यासाठी घराकडे धावले, परंतु तोपर्यंत त्यांच्या छाती आणि मांडीला दोन गोळ्या लागल्या, तर धर्मेंद्र यांच्या जोडीदाराच्या पायाला गोळी लागली. यानंतर धर्मेंद्र यांनी घरातून रिवॉल्व्हर घेऊन आरोपीच्या मागे पळ काढला. पण तोपर्यंत मोनू सोनकर आपल्या साथीदारांसह तेथून पळून गेला. धर्मेंद्र यांचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंब बाहेर आले आणि त्यांनी धर्मेंद्र सोनकर यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टर ऑपरेशन करीत असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धर्मेंद्र सोनकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वांना परत पाठविले. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय रुग्णालयात पाठविला. आरोपी मोनू सोनकर याची पोलिस चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोनू सोनकर आणि धर्मेंद्र सोनकर यांच्यात बराच काळ जमीनीचा वाद होता.