JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / लॉकडाऊनमध्येही या कपलने पूर्ण केली 42 किमी मॅरेथॉन, पाहा कसा केला जुगाड

लॉकडाऊनमध्येही या कपलने पूर्ण केली 42 किमी मॅरेथॉन, पाहा कसा केला जुगाड

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, लॉकडाऊनमध्ये हे घराबाहेर पडले कसे?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 30 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे साऱ्या जगात हाहाकार माजला. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडता येत नाही आहे. या सगळ्यात एका कपलने आपला फिटनेस राखण्यासाठी एक अजब जुगाड केला. त्यांनी चक्क 42 किमीचे अंतर धावून पूर्ण केले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, लॉकडाऊनमध्ये हे घराबाहेर पडले कसे? पण हे कपलने घराबाहेर न पडता 42 किमी अंतर पूर्ण केले ते आपल्या 20 मीटरच्या बाल्कनीत. दुबईमध्ये राहणाऱ्या 41 वर्षीय कोलिन अॅलनने आपली पत्नी हिल्डासोबत 20 मीटरच्या बाल्कनीमध्ये 42.2 किमी मॅरोथॉन पूर्ण करण्याची कामगिरी केली. त्यांनी आपल्या बाल्कनीला चक्क 2100 फेऱ्या मारल्या. त्यांच्या या फिटनेस फंड्याचे जगभरातून कौतुक केले जात आहे. यात त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीने महत्त्वाची कामगिरी बजावली.

एवढेच नाही तर, या कपलने आपल्या या मॅरेथॉन स्पर्धेचे ऑनलाईन प्रक्षेपणही केले होते. 42.2 किमी अंतर या कपलने 5 तास, 9 मिनिटे आणि 39 सेकंदात पूर्ण केले. कोलिनने इन्स्टाग्रावर पत्नीसोबत फोटो टाकत, आम्ही करून दाखवलं #BalconyMarathon असे कॅप्शन दिले आहे. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात

कोलिनने ऑनलाईन या स्पर्धेचे आयोजनही केले होते. ज्यात तुम्ही धावतानाचा फोटो टाकत, या सहभागी होऊ शकता.

जाहिरात

यात एकच नियम आहे, तो म्हणजे घरातून बाहेर न पडण्याचा. ही स्पर्धा तुम्हाला बाल्कनी किंवा घरातच पूर्ण करावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या