JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Coronavirus India Case: देशात 2 लाखांपर्यंत पोहोचला कोरोनाचा आकडा, ही आहे ताजी आकडेवारी

Coronavirus India Case: देशात 2 लाखांपर्यंत पोहोचला कोरोनाचा आकडा, ही आहे ताजी आकडेवारी

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 198706 मध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याचबरोबर मृतांची संख्या 5598 वर पोहोचली आहे.

जाहिरात

जागतिक आरोग्य संघटना कोरोना महासाथीदरम्यान पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर कोरोना संक्रमणाच्या संख्येत 5 पटीने वाढ झाली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 जून : देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एकूण कोरोना रूग्णांची संख्या दोन लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. त्याचबरोबर, गेल्या 24 तासात पुन्हा एकदा 8 हजारांहून अधिक कोरोना रूग्ण समोर आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 198706 मध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याचबरोबर मृतांची संख्या 5598 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 8171 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत तर 24 तासात 204 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत बरे 91818 रुग्ण बरे झाले आहेत. 93322 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 48.07 टक्के इतकी आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 70013 झाली आहे. यापैकी 37543 लोकांवर उपचार सुरू आहेत, तर 30108 लोक बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 2362 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाचे 20834 रुग्ण आहेत, त्यापैकी 8746 लोक बरे झाले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 11565 रुग्ण सक्रिय असून विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजधानी दिल्लीत संक्रमणामुळे मृतांचा आकडा 523 वर पोहोचला आहे. पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे, निसर्ग चक्रीवादळ घेणार रौद रुप

संबंधित बातम्या

देशातील कोरोना वाढत्या संक्रमणात एक दिलासादायक बातमी म्हणजे मोठ्या संख्येने रुग्णही बरे होत आहेत. देशातील 14 राज्यांत उपचार घेत असलेल्या रूग्णांपेक्षा उपचार घेतलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते, ही आकडेवारी लोकांमध्ये कोरोनाची भीती दूर करेल. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लढाई आतापर्यंत 48 टक्के लोकांनी जिंकली आहे. बर्‍याच राज्यात बरे होण्याचा दर त्याहूनही चांगला आहे. पंजाबमधील सर्वाधिक 88 टक्के आहे. तिथे 2263 पैकी 1987 रूग्ण बरे झाले आहेत. तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा मुंबईत करोनाने मृत्यू, 10 तास नाही मिळाला बेड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या