अमरावती, 04 एप्रिल : जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसने अनेकांचा बळी घेतला आहे. राज्यातही कोरोना रुग्णांच्या मृतांच्या संख्यमध्ये वाढ झाली आहे. अमरावतीमध्येही कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. अमरावती शहरातील एका इसमाचा कोरोणाने मृत्यू झाला. त्यामुळे आता राज्यात कोरोना मृतांची संख्या 21 वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईत 17, मुंबई उपनगरात 1, पुण्यात 1, बुलढाणा 1, अमरावतीमध्ये 1 असा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना झाल्यामुळे 2 एप्रिल रोजी इसमाला जिल्हा सामान्य रुग्णालयात अडमिट केले होते. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. पण त्याच दिवशी सकाळी 9.30 वाजचा रुग्णाचा मृत्यू झाला. आज पहाटे 3 वाजता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा आला अहवाल प्राप्त झाला. त्यामुशे जिल्हा प्रशासनाने हैदरपुरा परिसर पूर्णपणए सील केला आहे. दरम्यान, कोरोनाव्हायरचे महाराष्ट्रात काल दिवसअखेर 490 रुग्ण झाले. गेल्या 24 तासांत 67 नवे रुग्ण सापडले. त्यातले सर्वाधिक मुंबईत सापडले. त्यानंतर पुण्यात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. दिवसभरात मुंबईत 43 कोरोनाग्रस्त दाखल झाले. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 278 झाली आहे. पुण्यात 9 रुग्ण सापडले तर नवी मुंबईत 8 कोरोनाग्रस्त सापडले. राज्यात एकूण 490 कोरोनाचे रुग्ण दाखल झाले. त्यातले 20 बरे झाले आहेत. मुंबई – 278 पुणे (शहर व ग्रामीण भाग)– 70 मुंबई वगळून मंडळातीत इतर मनपा व जिल्हे 54 सांगली – 25 नागपूर – 16 अहमदनगर – 20 बुलढाणा- 5 यवतमाळ – 4 सातारा – 3 औरंगाबाद – 3 कोल्हापूर – 2 रत्नागिरी – 2 वाशिम-1 सिंधुदुर्ग – 1 गोंदिया – 1 जळगाव- 1 नाशिक – 1 उस्मानाबाद -1 इतर राज्य (गुजरात) – 01 खरा धोका एप्रिलअखेरी भारतात या साथीचा कहर (Peak of pendemic) या महिन्याच्या अखेरीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लॉक डाउन संपलं तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेच लागणार आहेत. इटली आणि स्पेनमध्ये जे आत्ता घडत आहे तसा वेगाने फैलाव आणि वाढता मृत्युदर रोखायचा असेल तर घरात राहणं याला पर्याय नाही, असं तज्ज्ञ सांगतात. गर्दी टाळली तरच या विषाणूचं संक्रमण आटोक्यात राहील. भारतासारख्या देशात लोकसंख्या आणि राहण्याची पद्धत लक्षात घेता कोरोनाची साथ उग्र रूप धारण करू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.