कोची, 12 एप्रिल : देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव वेगानं वाढत आहे. आतापर्यंत 8 हजार 356 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तर हा संसर्ग झपाट्यानं वाढत असल्यामुळे दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात येण्याचे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले आहे. लॉकडाऊनमुळे दारूची दुकानं बंद आहेत. त्यामुळे अनेक तळीराम अस्वस्थ झाले आहेत. दारू मिळवण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. या सगळ्यात कोयंबटूर इथे एक अजब प्रकार घडला. दारू न मिळाल्यानं तरुणानं थेट न राहून सॅनिटायझरची बॉटल तोंडाला लावली. सॅनिटाझर प्यायल्यानं या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हे वाचा- लॉकडाऊन तर वाढवला पण अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी सरकारचं ‘हे’ आहे प्लानिंग मिळालेल्या माहितीनुसार बर्नार्ड नावाच्या तरुणाला खूप दारू पिण्याची सवय होती. लॉकडाऊनमुळे दारू विकण्यावर बंदी आली सगळी दुकानं बंद आणि घराबाहेरही पडण्यास बंदी असल्यानं अखेर न राहून तरुण सॅनिटायझर प्यायला. बर्नार्डच्या पत्नीनं दिलेल्या माहितीनुसार तो एका गॅस एजन्सीमध्ये काम करत होता. तिथे सॅनिटायझर ठेवण्यासाठी देण्यात आले होते. दारूची सवय दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे त्याचं मानसिक आणि शारीरिक संतुलनही बिघडलं होतं. दारू न मिळाल्यानं अखेर तो सॅनिटायझर प्यायला. बर्नार्डला पत्नी आणि नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी देण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू आहे. या आधी कोरोनाच्या भीतीनं एका कैद्यानं दारू समजून सॅनिटायझरचं सेवन केलं होतं. या कैद्याचाही त्यावेळी मृत्यू झाला होता. हे वाचा- वृद्धाच्या अंत्यसंस्काराला लोकांची गर्दी, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टनंतर खळबळ