JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / चीनने पुन्हा एकदा रचला मोठा कट, मोदींपासून ते संपादकांपर्यंत सगळ्यांची मिळवली माहिती

चीनने पुन्हा एकदा रचला मोठा कट, मोदींपासून ते संपादकांपर्यंत सगळ्यांची मिळवली माहिती

इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी वृत्त प्रकाशित केल्यानंतर झेन्हुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडच्या फेसबुकशी लिंक असलेल्या पेजवर फेसबुकने बंदी घातली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावात (Ladakh Border Dispute) चीन आणखी एक मोठा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. चीन हा भारताची अर्थव्यवस्था (Economy) आणि परराष्ट्र धोरणांवरसुद्धा (Foreign Policy) हेरगिरी करत आहे. मागच्या काही दिवसांपासून ज्यापद्धतीने घटना समोर येत आहेत त्यानुसार तपासात समोर आलं आहे की, चीनने त्यांच्या एका कंपनीतून भारताच्या अनेक संशोधक, थिंक टँक आणि मीडियाच्या संघटनांशी जोडलेल्या 200 लोकांची माहिती मिळवली आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी वृत्त प्रकाशित केल्यानंतर झेन्हुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडच्या फेसबुकशी लिंक असलेल्या पेजवर फेसबुकने बंदी घातली आहे. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, चीनचं सैन्य आणि गुप्तचर यंत्रणाशी जोडली गेलेली झेन्हुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडने ओव्हरसीज इंडिव्हिज्युअल डेटाबेस (OKIDB) अंतर्गत भारताच्या 40 सेवा देणारे आणि सेवानिवृत्त भारतीय विदेश सेवा (आईएफएस)चे अधिकारी, ज्यांनी प्रमुख राजकीय पदांना सांभाळलं आहे यांची माहिती गोळा केली आहे. पोलिसांनी कारवाई केल्याचा गुंडांनी घेतला भयंकर बदला, चाकूने केले सपासप वार तपासामध्ये ज्या नावांचा खुलास करण्यात आला आहे त्यामध्ये परराष्ट्र सचिव हर्षवर्धन यांच्यापासून ते इस्रायलमधील भारताचे राजदूत संजीव सिंगला यांचंही नाव आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वैयक्तिक सचिव म्हणूनही संजीव सिंगला यांनी काम केलं आहे. इतकंच नाही तर संयुक्त राष्ट्रामध्ये तैनात असलेल्या सदस्यांचा समावेश असलेल्या आयएफएस अधिकाऱ्यांवरही चीन सतत देखरेख ठेवत आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती आणि संयुक्त तपासणी युनिटचे ए गोपीनाथन यांचीही नावं आहेत. हाँगकाँग आणि चीनमध्येही सेवा देणारे ओकेआयडीबीमधले जपानचे राजदूत संजय वर्मा यांचेही नाव यामध्ये समोर आलं आहे. इतकंच नाही तर सौदी अरेबियामध्ये राजदूत औसफ सईद आणि मॅडागास्करमधील राजदूत अभय कुमार यांचादेखील समावेश आहे. यामध्ये एनआयटीआय आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, विद्वान इतिहासकार रोमिला थापर आणि राजकीय मानसशास्त्रज्ञ अशोक नंदी, ध्रुव जयशंकर ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे संचालक यांचा समावेश आहे. चीनशी झालेल्या तणावावर आज राज्यसभेला संबोधित करणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्राध्यापक ते खासदारापर्यंतच्या लोकांची नावं चीनच्या या नव्या प्लानमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यामध्ये चीनने प्राध्यापक ते खासदार अशा सगळ्यांची माहिती मिळवली आहे. डेटाबेसमध्ये अशोक विद्यापीठाचे प्राध्यापक प्रताप भानु मेहता आणि द इंडियन एक्सप्रेसचे योगदान संपादक सी राजा मोहन यांचीही नावे आहे. तर अहवालामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपति राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पाच माजी पंतप्रधान, 40 माजी आणि विद्यमान मुख्यमंत्री, खासदार, आमदार, महापौर, सरपंच आणि सैन्य यांच्यासह सुमारे 1350 लोकांचा रिअल टाईम डेटा चोरीला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या