मुंबई, 27 जानेवारी: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सर्वात जास्त पैसे कमवणारा सेलिब्रिटी म्हणून त्याची ओळख असतानाच आता भाईजान कर्जात असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. करोडोंचा मालक असणाऱ्या सलमान खाननं चक्क कर्ज न फेडल्यानं चाहते नाराज झाले आहेत. नेमकं सलमान खानवर कोणतं कर्ज आहे आणि त्याने का? घेतलं होतं माहीत आहे का? नुकत्याच पार पडलेल्या उमंग 2020 महोत्सवात सलमान खाननं एक किस्सा सांगितला. त्याचा हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान म्हणाला माझी सायकल पंक्चर झाली होती. त्यावेळी मी दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकडे गेलो. मी हाफ पॅन्ट घातल्यामुळे माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते. हे सगळं अचानक झालं होतं. मी त्या काकांना सांगितलं प्लीज मला सायकल दुरुस्त करुन द्या मी नंतर पैसे देतो. त्या काकांनी मला दिलेल्या उत्तरानं मला ओशाळल्यासारखं झालं. ते म्हणाले तू लहानपणीही असच करायचास. खूप वर्षांपूर्वी तू सायकल दुरुस्त करायला आला होतास. त्याचे पैसे तू आजपर्यंत दिले नाहीस. काकांचं हे उत्तर ऐकून मला दोन मिनिटं ओशाळल्यासारखं झालं असं सलमान खाननं सांगितलं. त्यानंतर मात्र सलमान खाननं सांगितलं की मी पैसे द्यायला गेलो होतो मात्र त्या काकांनी पैसे घेण्यास नकार दिला. मला पैसे नकोत असंही ते म्हणाले.
याशिवाय सोनी टीव्हीनं नुकत्याच त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये सलमान खान डान्स केल्यानंतर कपिल शर्माच्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसत आहे. यावेळी कपिल शर्मा विचारतो. जेव्हा सोशल मीडियावर तुझ्या फिमेल फॅन तुला मसेज करतात मग कधी असं झालं आहे का की एखादी मुलगी तुला खूपच सुंदर दिसली तर तू तिचा फोटो झूम करुन कधी पाहतोस का? यावर सलमान म्हणाला मी बाकी कोणाचे नाही मात्र कतरिनाचा प्रत्येक फोटो झूम करून पाहतो.
सलमान खान सध्या आपल्या राधेः द मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ईद दिवशी रिलीज होईल. अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटापासून राधेचा संघर्ष होणार असल्याचं सांगितलं जात आहे.