JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Tailbone Pain : माकडहाडाच्या वेदनांमुळे त्रस्त झालाय का? हे 4 घरगुती उपाय करून बघा परिणाम

Tailbone Pain : माकडहाडाच्या वेदनांमुळे त्रस्त झालाय का? हे 4 घरगुती उपाय करून बघा परिणाम

माकड हाडाच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात, त्याविषयी जाणून घेऊया. अनेकदा डॉक्टरांकडे न जाता या उपायांनी आराम मिळू शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जुलै : माकड हाडाच्या दुखण्यामुळे बसता-उठताना, शौचालयाला बसताना, बसल्यानंतर अचानक उभे राहताना खूप वेदना होतात. त्रास जास्त होत असल्यास रोजची दैनंदिन कामे करणेही मुश्कील होते. काही घरगुती उपाय करून या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. या घरगुती उपचारांमध्ये गरम आणि कोल्ड कॉम्प्रेस, मसाज तंत्र, नैसर्गिक तेल वापरणे आणि इतर काही उपायांचा समावेश आहे, त्याविषयी जाणून (Tailbone Pain Remedies) घेऊया. माकड हाडाच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात, त्याविषयी जाणून घेऊया. माकड हाडाच्या वेदनांचे कारण - स्टाइलक्रेझ च्या माहितीनुसाप, कधीकधी जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे माकडहाडामध्ये (टेलबोन) वेदना होतात. ही वेदना व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 6, बी 12 शी संबंधित असू शकते. त्यामुळे जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढणेही खूप गरजेचे आहे. त्यामुळे ही सर्व जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात खावीत. घरगुती उपाय गरम पाण्यानेही चांगला परिणाम होऊ शकतो. यासाठी एका बाटलीत गरम पाणी घ्या. आता ही बाटली वेदनादायक भागावर 20 मिनिटे दाबून ठेवा. असे दिवसातून किमान चार वेळा करा. कोणतेही मसाज तेल घ्या. 10 ते 15 मिनिटे या तेलाने प्रभावित भागावर अतिशय हलक्या दाबाने मसाज करा. असा मसाज दिवसातून दोनदा करा. हे वाचा -  ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा एरंडेल तेलाचे काही थेंब आणि पट्टी घ्या. एरंडेल तेल थोडे थोडे गरम करा. आता हे गरम तेल पाठीच्या खालच्या भागात लावा आणि माकडहाड चोळा, त्यासाठी पट्टीचा उपयोग करा. हे वाचा -  डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर आपल्या आंघोळीच्या पाण्यात दोन कप एप्सम मीठ मिसळा. पाणी किंचित उबदार असावे. पाण्यात मीठ चांगले मिसळा आणि नंतर या पाण्याने आंघोळ करा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या