Amazon
मुंबई : Amazon कंपनीने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. अमेझॉननं आपल्या एक सेवेचे पैसे वाढवले आहेत. फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांनी ही सेवा घेतली आहे, त्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन फेब्रुवारीपासून काही म्युझिक सब्सक्रिप्शन प्लॅनच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा कंपनीने गुरुवारी केली Amazon.com आपल्या वेबसाइटच्या एफएक्यू पेजवर अपडेट पोस्ट केले. रॉयटर्सनुसार, अॅमेझॉन म्युझिकचा ‘अनलिमिटेड इंडिव्हिज्युअल प्लॅन’ किंमत 1 डॉलरवरून 10.99 डॉलर प्रतिमहिना करणार आहे, तर त्याचा ‘अनलिमिटेड इंडिव्हिज्युअल स्टुडंट प्लॅन’ दरमहा 4.99 डॉलरवरून 5.99 डॉलरपर्यंत वाढणार आहे.
Life insurance घेताना करु नका चुका, अन्यथा…CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार 21 फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर ही सेवा वापरत असाल तर तुमच्याही खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. 21 फेब्रुवारीनंतर ग्राहकांना त्यांच्या बिलात अपडेट्स दिसू लागतील. ई-कॉमर्स कंपनीने शिपिंग आणि वेजच्या उच्च खर्चाची भरपाई करण्यासाठी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वार्षिक यूएस प्राइम सब्सक्रिप्शनच्या किंमतीत 17% वाढ केली होती. सध्या अमेझॉन कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. जगात आर्थिक मंदीचं संकट आहे. महागाई वाढत आहे. त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
गाडीचा इंश्युरन्स काढण्याआधी या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…अमेझॉनने वाढवलेल्या या किंमतीचा भारतावर काय परिणाम होणार हे फेब्रुवारीमध्ये समजेल. सध्या भारतात अमेझॉन प्राईमसाठी सब्स्क्रिप्शन घ्यावं लागतं. मात्र अमेझॉन म्युझिकचे देखील भारतातील नियम बदलणार का हे पाहावं लागणार आहे.