JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / राज-गडकरी भेटीवर चर्चा?, पदाधिकार्‍यांसोबत महत्त्वाची बैठक

राज-गडकरी भेटीवर चर्चा?, पदाधिकार्‍यांसोबत महत्त्वाची बैठक

11 मार्च : शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांची आज महत्त्वपूर्ण बैठक होते आहे. या बैठकीकडे राजकीय अभ्यासकांबरोबरच भाजपचंही लक्ष लागलं आहे. नितीन गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे शिवसेना नाराज आहे. त्यानंतर गडकरी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.त्यासाठी गडकरी यांनी शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांना साकडे घातले असून आपण राज यांची भेट महायुतीच्या फायद्यासाठी घेतली आहे असं म्हणटलं आहे. मनसेनं निवडणूक लढू नये हीच माझी भुमिका होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Image img_61332_uddhav_240x180.jpg11 मार्च :    शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांची आज महत्त्वपूर्ण बैठक होते आहे. या बैठकीकडे राजकीय अभ्यासकांबरोबरच भाजपचंही लक्ष लागलं आहे. नितीन गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे शिवसेना नाराज आहे. त्यानंतर गडकरी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.त्यासाठी गडकरी यांनी शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांना साकडे घातले असून आपण राज यांची भेट महायुतीच्या फायद्यासाठी घेतली आहे असं म्हणटलं आहे. मनसेनं निवडणूक लढू नये हीच माझी भुमिका होती. पण या भेटीचे राजकीय तर्क वितर्क काढण्यात आले. या भेटीकडे गैरसमजूतीतून पाहू नये, अशी विनंती गडकरींनी शिवसेनेच्या नेत्यांसमोर केली आहे. तसंच आपलं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवावे अशी विनंतीही गडकरी यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या