
25 मे : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला 36 तासांपेक्षा कमी अवधी उरला आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. कार्यक्रम देखणा आणि भव्य व्हावा यासाठी विशेष तयारी करण्यात येते आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन. तसच खबरदारीचा उपया म्हणून दरबार हॉलही सज्ज ठेवण्यात आला आहे. शपथविधीची वेळ संध्याकाळची असल्यानं. लक्षवेधी प्रकाशयोजनाही करण्यात येणार आहे. जवळपास 4 हजार जण या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
शपथविधीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सार्क देशांचे राष्ट्रप्रमुख आणि निवडक निमंत्रीतांसाठी मेजवानी देणार आहेत. राष्ट्रपती भवनात सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट ठेवण्यात आली ाहे. त्यासाठी दिल्लीतल्या तब्बल 7000 पोलीस तैनात करण्यात आलेत. उद्या सकाळी 7.30 वाजता मोदी राजघाटावर जाणार आहेत. गांधींजींच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करतील राजघाटावर मोदी जातील तेव्हा त्यांना पंतप्रधानांच्या दर्जाची सुरक्षा पुरवली जाईल अशी माहिती दिल्लीचे सहआयुक्त एम के मीना यांनी ही माहिती दिली आहे.
हे पाहुणे येणार आहेत
शपथविधी सोहळ्याचा मेन्यू शाकाहारी आणि मांसाहारी अल्पोपाहार
रात्रीचं जेवण
मुख्य जेवण
गोड पदार्थ