JOIN US
मराठी बातम्या / देश / पत्नीला डावलून भाजपने पतीला दिली उमेदवारी, MLA होताच आमदाराच्या पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

पत्नीला डावलून भाजपने पतीला दिली उमेदवारी, MLA होताच आमदाराच्या पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

स्वाती सिंह आणि दयाशंकर सिंह घटस्फोटासाठी आधीच कोर्टात गेले होते, पण 2018 मध्ये दोघंही कोर्टात गैरहजर राहू लागले तेव्हा हे प्रकरण बंद करण्यात आलं. त्यानंतर आता पुन्हा स्वाती सिंह यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 22 मार्च : भाजप नेत्या आणि सध्या कार्यवाहक उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री स्वाती सिंह (Swati Singh) या आपले पती दयाशंकर सिंह (Dayashankar Singh) यांच्यासोबत घटस्फोट (Divorce) घेण्याच्या तयारीत आहेत. स्वाती सिंह यांनी यासाठी पुन्हा कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. स्वाती सिंह यांचा पती दयाशंकर सिंह यांच्यासोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. स्वाती सिंह आणि दयाशंकर सिंह घटस्फोटासाठी आधीच कोर्टात गेले होते, पण 2018 मध्ये दोघंही कोर्टात गैरहजर राहू लागले तेव्हा हे प्रकरण बंद करण्यात आलं. त्यानंतर आता पुन्हा स्वाती सिंह यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

गोव्याचा मुख्यमंत्री ठरला! भाजप आमदारांच्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब

स्वाती सिंह तेव्हा प्रसिद्धी झोतात आल्या जेव्हा त्यांचे पती आणि भाजप नेते दयाशंकर सिंह यांनी बसपा प्रमुख मायावती यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर वाद वाढला आणि स्वाती सिंह यांनी पतीची बाजू घेत त्यांच्या बाजूने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपने स्वाती सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि विजयानंतर स्वाती सिंह यांना योगी सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आलं. यानंतर पती-पत्नीमधील वाद दडपून राहिला. मात्र हा वाद पुन्हा वाढला जेव्हा यावेळी दयाशंकर सिंह यांनीही विधानसभा निवडणूक (Assembly Election 2022) लढवण्यासाठी तिकीटाची मागणी केली, तेही त्याच सीटवरून जिथे त्यांच्या पत्नी तिकीट मागत होत्या. यानंतर भाजपने स्वाती सिंह यांचं तिकीट कापून दयाशंकर सिंह यांना बलियामधून उमेदवारी दिली. येथून दयाशंकर सिंह विजयी झाले आहेत. योगींच्या मंत्रिमंडळात दयाशंकर सिंह यांना स्थान मिळू शकतं, असंही बोललं जात आहे.

तेलंगणामध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात राडा, दगडफेकीत पोलीस जखमी

आता पुन्हा एकदा पती-पत्नी दोघंही कोर्टात आमनेसामने उभे ठाकणार आहेत. इतके दिवस रखडलेला वाद या अर्जामुळे पुन्हा एकदा वाढणार असल्याचं बोललं जात आहे. स्वाती सिंह यांच्या अर्जावर न्यायाधीशांनी निर्णय राखून ठेवला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ५ मे रोजी होणार आहे. घटस्फोटाच्या या प्रकरणावर पुढील निर्णय त्याच दिवशी घेतला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या