जोधपूर, 10 एप्रिल : मागील पिढीच्या तुलनेत आताच्या पिढीला एक ठराविक वयोमर्यादा ओलांडल्यावर देखील वेगवेगळे खेळ खेळण्याची आवड असते. ही आवड पूर्ण करण्याची त्यांना अनेकदा संधीही मिळते. मात्र, वर्षानुवर्ष पारंपरिक पेहरावात वावरणारे वयस्कर महिला आणि पुरुष असे खेळ खेळण्यास संकोचतात. अशाच एका अनोख्या कार्यक्रमात पारंपरिक पेहरावातल्या या ज्येष्ठ मंडळींना खेळण्याची संधी देण्यात आली. या कार्यक्रमातलं मैदानही अनोखं होतं आणि तिथले खेळही. नुकताच राजस्थानातल्या जोधपूर जिल्ह्यात बिलारा भागात हा कार्यक्रम पार पडला. यात सहभागी झालेल्या खेळाडूंच्या खेळ खेळण्याच्या शैलीनं वातावरणात उत्साह भरला. कार्यक्रमाचं निमित्त होतं एका मंदिराच्या जीर्णोद्धाराचं. यावेळी झालेल्या अनोख्या क्रीडा स्पर्धा (Unique sporting events) पाहून अनेकांना काहीतरी नवीन पहायला मिळाल्याचं समाधान मिळालं. कार्यक्रमात ज्येष्ठ महिला घुंघट घालून कबड्डी खेळत होत्या, तर वृद्ध पुरुष धोतर नेसून शर्यतीत धावत होते. या कार्यक्रमाची रंजकता पाहून तो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. हे वाचा - बापरे! 2 दशकांत जंगलातले वणवे 10 पटींनी वाढले, सर्वांसाठीच धोकादायक स्थिती जीन्स घातलेल्या मुली आणि घुंघटच्या आडून परंपरा पाळणाऱ्या महिलांची कबड्डी जोधपूरच्या बिलारा तहसील भागातल्या भावी गावात श्रीसती माता सिलुदेवी सरण मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ७ दिवस चाललेल्या या कार्यक्रमात गुरुवारी वातावरण असं होतं की, जाट समाज आणि सारण जमातीच्या लोकांसाठी खेळांचं आयोजन केलं होतं. यादरम्यान येथे अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जीन्स घातलेल्या तरुण मुली आणि घुंघटच्या आडून परंपरा पाळणाऱ्या महिलांचा कबड्डीचा सामना चुरशीचा झाला. हे वाचा - या मंदिरात 40 वर्षांपासून अखंड सुरू आहे रामायणाचा पाठ, Booking वर्षभर आधीच होतं शुद्ध देशी खेळ आणि देशी खेळाडू येथे महिलांची 100 मीटर शर्यत पार पडली. यामध्ये 18 महिलांचा सहभाग होता. ज्येष्ठांसाठी 100 मीटरची शर्यत होती. त्यात 24 ज्येष्ठांनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन करून दाखवलं. शुद्ध देशी टेम्परिंगच्या या मैदानात गावकऱ्यांनी खूप मजा केली. शर्यतीत एका महिलेचं पडणे आणि तिचा उत्साह तरीही कायम राहणं, पुन्हा उठणं आणि शर्यतीत आपली ताकद दाखवणं सर्वांनाच आवडलं. शुक्रवारी महिलांच्या शर्यतीनं खेळाला सुरुवात झाली. यामध्ये घराघरांतील महिला घुंघट घालून धावल्या आणि कबड्डीही खेळल्या. एकूण 11 प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं.