नवी दिल्ली, 6 जुलै : कोरोनाव्हायरसमुळे जगभरात मोठ्या संख्येने लोकांना लागण झाली आहे. दिवसेंदिवस संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. कोविड – 19 वर अद्यापही प्रभावी लस वा उपचार सापडलेला नाही. दरम्यान, चीनमधून आणखी एक भयानक बातमी समोर आली आहे. उत्तर चीनमधील एका शहरात रविवारी प्लेगची दोन प्रकरणं समोर आली आहे. यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावर उद्योपगपती आनंद महिंद्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे – मानव जातीवर कृपा करा. आता अशा बातम्या सहन होत नाहीत. मी अशा बातम्या आता अजून सहन करू शकत नाही. हे वाचा- कोरोनाला हरवल्यानंतर भाजप नेत्याने केलं हे काम, वाचून तुम्हीही कराल कौतुक प्लेग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहजपणे पसरतो चिनी माध्यमांच्या म्हणण्यानुसार बुबॉनिक प्लेगची दोन प्रकरणे समोर आली आहेत. वास्तविक, हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. त्यामुळे अजून बरीच प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. परिणामी शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीनच्या अधिकृत माध्यम पीपल्स डेली ऑनलाईननुसार इनर मंगोलियन स्वायत्त प्रदेश बनयानूरने प्लेगच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी तिसर्या स्तराचा इशारा दिला आहे.
शनिवारी बयन्नूर येथील रूग्णालयात ब्यूबोनिक प्लेगच्या घटनेनंतर स्थानिक आरोग्य विभागाने 2020 अखेरपर्यंत हा इशारा सुरू असल्याचे जाहीर केले आहे. स्थानिक आरोग्य विभागाने सांगितले की, शहरात सध्या मानवी प्लेगच्या साथीचा धोका आहे. जनतेने आत्मरक्षणासाठी जागरूकता वाढवावी आणि आरोग्यास असामान्य परिस्थितीबद्दल त्वरित माहिती द्यावी. अधिकृत झिनहुआ या वृत्तसंस्थेने १ जुलै रोजी सांगितले की पश्चिम मंगोलियाच्या खोड प्रांतात बुबोनिक प्लेगची दोन प्रकरणं समोर आली. संपादन - मीनल गांगुर्डे