नवी दिल्ली 10 जून: सीरियामध्ये तैनात असलेले अमेरिकन सैन्य सध्या इलेक्ट्रॉनिक दुर्बिण रायफलची चाचणी घेत आहेत. जी लक्ष्याची हमी मिळाल्यानंतरच गोळी चालविण्याची परवानगी देते. लिनक्स प्रणालीवर आधारित सुसज्ज अशा या दुर्बिणीला स्मॅश 2000 असं नाव देण्यात आलं आहे. ही रायफल शुटिंगवर किंवा लक्ष्य भेदल्यानंतर गोळीबाराच्या अचूकतेची गणना करते. एकदा ही गोळी चालविल्यानंतर गोळी निश्चित ठिकाणी लागल्याची खात्री झाल्यावर ही रायफल जवानाला ट्रिगरवर चालविण्याची परवानगी देते. जर गोळी निश्चित टार्गेट वर लागली नाही तर ही दुर्बीण रायफल गोळी चालविण्यासाठी परवनगी देत नाही. या दुर्बीण रायफलद्वारे हवेत 400 फूटांपर्यंत वेगाने फिरणारे लहान लक्ष्य देखील पूर्ण अचूकतेसह भेदले जाऊ शकते,असा दावा केला जातो. जॉर्डन-इराक सीमेजवळील अल्ताफ तळावर, अमेरिकन सैनिक आकाशात ड्रोनद्वारे टांगल्या जाणाऱ्या लक्ष्याचा वेध घेत या दुर्बिणीची चाचणी घेत आहे. इस्रायली सैन्याने अमेरिके पूर्वी अशा प्रकारच्या रायफलच्या मैदानी चाचण्या घेतल्या आहेत. परंतु सीरियामध्ये प्रथमच त्याचा उपयोग होत आहे. अमेरिकन सैन्याने युद्धाच्या परिस्थितित वापरासाठी ही दुर्बिणीची यंत्रणा विकत घेतली आहे अशी माहिती पुढे आली आहे. पण ही दुर्बीण रायफल कोणत्या लष्करी कारवाईत वापरणार हे अधिकृतपणे सांगण्यात आले नाही. परंतु सैन्याने जाहीर केलेली छायाचित्रे हे ड्रोन कारवायांविरूद्ध अधिक उपयुक्त असल्याचे सिद्ध होत आहे. या रायफलमध्ये पाळत ठेवणार्या उपकरणासह व्हिडिओ रेकॉर्डरचा वापर केला जाऊ शकतो. टेलीस्कोप निर्मात्या इस्त्रायली कंपनी स्मार्ट सूटरच्या म्हणण्यानुसार, वेगवान गतिमान लहान लक्ष्य पकडण्यासाठी त्याच्याकडे ड्रोन मोड आहे. अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन्स कमांडने मागील वर्षी प्रारंभिक चाचण्यांसाठी 98 टेलीस्कोप सिस्टम खरेदी केले आहे.