JOIN US
मराठी बातम्या / देश / पीपीई किटमुळे कोरोना योद्ध्यांची तब्येत ढासळली, रुग्णांचे सॅम्पल घेताना सुरू झाला त्रास

पीपीई किटमुळे कोरोना योद्ध्यांची तब्येत ढासळली, रुग्णांचे सॅम्पल घेताना सुरू झाला त्रास

ड्यूटी संपेपर्यंत कोरोना योद्ध्यांना पीपीई किट काढता येत नाही. त्यांना यादरम्यान पाणीही पिता येत नाही

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 25 मे : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यात रुग्णालयात वाढणारी रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना पीपीई किट घालणं अनिवार्य असतं. कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पीपीई किट घालणं आवश्यक आहे. या किटमध्ये तासनतास राहावे लागत असल्याने भोपाळमधील एका सरकारी रुग्णालयातील कोरोना योद्ध्यांना वॉर्डमध्येच घेरी आल्याची घटना घडली आहे. सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत पीपीई किट घालून काम करणे अवघड असते. सोमवारी पीपीई किट घालून काम करणाऱ्या कोरोनो वॉरिअर्सची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयात सॅम्पल घेणाऱ्या महिला, पुरुष स्टाफ नर्स आणि डॉक्टरांची तब्येत बिघडडी. इतक्या उन्हात पीपीई किट घालून काम करीत असल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास होऊ लागला. पीपीई किटमध्ये खूप जास्त गरम होत होतं. घामाघूम झालेल्या योद्ध्यांना चक्कर येऊ लागली.  सोमवारी पीपीई किटमुळे चक्क आलेल्या तब्बल 6 जणांना ग्लुकोज चढवावे लागले. पीपीई किटमध्ये काय होतो त्रास 6 ते 8 तासांपर्यंत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालून काम करावे लागते. यामध्ये रक्तदाब वाढणे, डिहायड्रेशन, चक्कर येणं, अस्वस्थ वाटणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो. काम करीत असताना हे किट काढू शकत नाही. अशा परिस्थितीत अनेकांची तब्येत बिघडले. हे वाचा - कर्तव्यात कसूर नाही! घरी बसून फेस शील्ड तयार करतेय CRPF ची महिला जवान

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या