बांका, 5 मे : लॉकडाऊनमध्ये (Lockdown) रोजंदारीवर काम करुन घर चालविणाऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचा अत्यंत वाईट परिणाम गेल्या काही दिवसांमध्ये विविध घटनांमधून दिसून येत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमधील बांका येथील रिक्षा चालकाची आहे. त्याने आर्थिक चणचणीत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सध्या विविध राज्यांच्या सरकारानी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्याची सोय केली आहे. आतापर्यंत अनेक मजूर आपल्या घरी पोहोचले आहेत. मात्र त्याचं भविष्य अधांतरी आहे. हातात पैसे नसल्याने त्यांच्यासमोर मोठी समस्या आ वासून उभी आहे. लॉकडाऊनमुळे रिक्षा चालवणं होतं बंद बलराम आपल्या कुटुंबापासून वेगळं राहायचा आणि रिक्षा चालून पोट भरत होता. मात्र लॉकडाऊनमध्ये त्याला रिक्षा चालवता येत नव्हती. परिणामी तो आर्थिक अडचणीत होता. परिणामी त्याने रात्री उशीरा धारदार सुरा गळ्यावर फिरवला, यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. रिक्षाचालकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. बलराम याचा नातेवाईक पवन याने सांगितले की, कुटुंबासोबत वाद होत असल्याने तो वेगळं राहत होता. त्यानंतर तो रिक्षा चालवून पोट भरायचा. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला आर्थिक चणचण जाणवू लागली. यामुळे तो तणावाखाली होता. पैशाचा अभाव असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पवनने सांगितले. संबंधित - दारुमुळे अख्खं कुटुंब झालं उद्ध्वस्त; पती-पत्नीमधील वादामुळे 4 जणांचा गेला बळी महिला झाल्या आक्रमक; भाजी बाजार 3 तास आणि दारुची दुकाने 7 तास खुली