JOIN US
मराठी बातम्या / देश / मद्यधुंद तरुणाकडून JCB ड्रायव्हरला शिवीगाळ, संतापलेला चालकानं असा शिकवला धडा

मद्यधुंद तरुणाकडून JCB ड्रायव्हरला शिवीगाळ, संतापलेला चालकानं असा शिकवला धडा

चालकाची गुंडागिरी! JCBच्या मदतीनं तरुणाला केली बेदम मारहाण, VIDEO

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 08 जुलै: मद्यधुंद तरुणाची दादागिरी ठेचून काढण्यासाठी जेसीबी चालकानं मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारू पिऊन तरुण शिव्या देत असल्यानं चालकाला राग अनावर झाला आणि त्यानं जेसीबीच्या मदतीनं तरुणाची धुलाई केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी जेसीबी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता मद्यधुंद तरुण चालकाला शिवीगाळ करत असताना जेसीबीच्या मदतीनं मारहाण करत आहे. दुसऱ्यांदा जेसीबी या तरुणाला धडक मारतो आणि मद्यधुंद तरुण खाली कोसळतो. ही घटना तेलंगणा इथल्या मंगापेटा परिसरात घडली आहे. अमानुषपणे मारहाण करणाऱ्या या जेसीबी चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

सुरुवातील या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता मद्यधुंद अवस्थेत असलेला तरुण उठून समोरून येणाऱ्या जेसीबीला शिवीगाळ करतो. त्यानंतर चालक रागात जेसीबीच्या सहाय्यानं तरुणाला मारतो. पहिल्यांदा त्याच्या डोक्यावर मारतो आणि नंतर त्याला टक्कर देतो. मद्यधुंद अवस्थेत असलेला तरुण खाली पडतो. अशा पद्धतीनं अमानुषपणे मारहाण करणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या