JOIN US
मराठी बातम्या / देश / परीक्षा न देताच 10वीची सर्व मुलं पास  होणार, या राज्याने घेतला मोठा निर्णय

परीक्षा न देताच 10वीची सर्व मुलं पास  होणार, या राज्याने घेतला मोठा निर्णय

कोरोनामुळे राज्यात एवढ्या मुलांची परीक्षा घेता येणार नाही असं राज्य सरकारने म्हटलं आहे.

जाहिरात

सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स असा आता फरक राहणार नाही. सगळ्या मुलांना सगळे विषय शिकण्याची सोय राहणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद 8 जून:  परीक्षा न देताच 10वीची सर्व मुलं पास करण्याचा निर्णय तेलंगाना सरकारने घेतला आहे. राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला. कोरोनामुळे राज्यात एवढ्या मुलांची परीक्षा घेता येणार नाही असं राज्य सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे सर्व मुलांना ग्रेड देऊन त्यांना पुढच्या वर्गात पाठवलं जाणार आहे. वर्षभरातल्या मुलांच्या प्रगतीवर त्यांना ग्रेड देण्यात येईल असं सरकारने म्हटलं आहे. तेलंगानात आजपासून 10वीची परीक्षा सुरू होणार होती. मात्र हायकोर्टाने कोरोनामुळे परीक्षा घेण्याला स्थती दिली होती. देशातल्या अनेक राज्यांमध्येही असाच प्रशान निर्माण झाला असून फक्त फायनलमध्ये असणाऱ्या मुलांचीच परीक्षा कशा पद्धतीने घेता येईल यावर विचार सुरू आहे.

संबंधित बातम्या

अनलॉक 1 नंतर देशातील अनेक ठिकाणी जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये देशातील शाळांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. HRD मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 3 जून रोजी झालेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील शाळा आणि महाविद्यांबाबत मोठा खुलासा केला आहे. कोरोनाच्या महासाथीत 16 मार्चपासून देशातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. ऑगस्ट 2020 नंतर शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा -  काही दिवसांत बदललं पुण्याचं चित्र, कोरोनाबाबत ही आहे POSITIVE NEWS तब्बल 33 कोटी विद्यार्थी शाळा केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत. पालक व शिक्षकांसोबत झालेल्या चर्चेनंतर एचआरडी मंत्री रमेश निशंक पोखरिया यांनी शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यातही 15 ऑगस्टनंतर शाळा व महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 15 ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचा निकाल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या