JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO : हायड्रो प्रोजेक्टमध्ये एका क्षणात झाले 7 स्फोट, भीषण आगीत अडकले 9 कामगार

VIDEO : हायड्रो प्रोजेक्टमध्ये एका क्षणात झाले 7 स्फोट, भीषण आगीत अडकले 9 कामगार

या ठिकाणाहून 8 कामगारांना रेस्क्यू करण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 21 जुलै: एक दोन नाही तर 7 ते 10 स्फोटांच्या आवाजनं तेलंगणातील नगरकुरनूल परिसर हादरला आहे. श्रीशैलम लेफ्ट बँक हायड्रो इलेक्ट्रीक प्रोजेक्टमध्ये भीषण स्फोट झाले आहेत. या प्रोजेक्टमध्ये जवळपास 17 कामगार काम करत होते. अचानक स्फोटाचे आवाज आले आणि आग भडकली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या ठिकाणाहून 8 कामगारांना रेस्क्यू करण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. हा प्लॅन्ट जमिनीखाली आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

य़ा व्हिडीओमध्ये 7 ते 10 स्फोट झाल्याचे आवाज येत आहेत. यासोबत आगीचा भडका मोठा उडत असल्याचंही दिसत आहे. या आगीत 9 मजूर अडकले असून सध्या त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे.तेलंगणाचे ऊर्जामंत्री जगदीश्वर रेड्डी हे बचाव कार्यात लक्ष ठेवून आहेत. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान आगीच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही जागा जमिनीखाली आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठल्यानं बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या