नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : काश्मीर, बंगळुरू, राजस्थानपाठोपाठ आता स्वाइन फ्लू (Swine flue) दिल्लीतही (Delhi) पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायलायातील (Supreme court) न्यायाधीशांनी (Judge) स्वाइन फ्लूची (H1N1) लागण झाली आहे. 6 न्यायाधीशांना स्वाइन फ्लू झाला असून, इतर न्यायाधीशांना त्याचा धसका घेतला आहे आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांकडे (Chief justice of India) केली आहे. सुप्रीम कोर्टातील 6 न्यायाधीशांना स्वाइन फ्लू झाला, अशी माहिती न्यायमूर्ती (Justice) डी. वाय. चंद्रचूड (DY Chandrachud) यांनी मंगळवारी दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांची भेट घेतली. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे (SA Bobde) यांच्याशी चर्चा केली आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. सरन्यायाधीशांची सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (एससीबीए)च्या अध्यशांशी बैठक होणार आहे.
यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण होईल. तोपर्यंत वकील आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय जस्टिस संजीव खन्ना यांनीदेखील मास्क घालून काम केलं.
तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणं, शिंका येणं, घशामध्ये खवखव, थकवा ही स्वाइन फ्लूची लक्षणं आहेत. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास सर्वसामान्य म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका.