JOIN US
मराठी बातम्या / देश / सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; काँग्रेसला उद्याच द्यावी लागणार परीक्षा

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; काँग्रेसला उद्याच द्यावी लागणार परीक्षा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 मार्च :  फ्लोअर टेस्टची मागणी करत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च (Supreme court) न्यायालयाचे दार ठोठावले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल दिला असून उद्या कमलनाथ (Kamalnath) सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. भाजपने दाखल केलेल्या याचिकेनंतर आज सर्वोच्च न्यायालयाने उद्याच फ्लोअर टेस्ट (Floor Test) होणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना 17 मार्चला फ्लोअर टेस्ट घेऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. मात्र, विधानसभाध्यक्षांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 16 मार्चला विधानसभेचं कामकाज 26 मार्चपर्यत स्थगित केल्याची घोषणा केली. असं असताना विधानसभेत फ्लोअर टेस्‍टची कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती. संबंधित -  मध्य प्रदेश: फ्लोअर टेस्टसाठी सुप्रीम कोर्टात BJP, शिवराज यांनी दाखल केली याचिका यानंतर मात्र  माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते आणि तातडीने फ्लोअर टेस्टची मागणी केली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे उद्या कमलनाथ सरकार बहुमत सिद्ध करू शकतात का हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपप्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशातलं काँग्रेस सरकार अस्थिर झालं. ज्योतिरादित्य यांच्या समर्थक 22 काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले आणि त्यामुळे सरकार अल्पमतात आलं. आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा कमलनाथ यांनी केला असला, तरी त्यांना आता ते उद्याच्या उद्याच सिद्ध करावं लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या