JOIN US
मराठी बातम्या / देश / #StopBhaashanTakeAction मोदींच्या भाषणानंतर काँग्रेसचा हल्लाबोल

#StopBhaashanTakeAction मोदींच्या भाषणानंतर काँग्रेसचा हल्लाबोल

कॉंग्रेसने असेही म्हटले आहे की, भारताला अशा नेत्याची गरज आहे जो अपयशाचा स्वीकार करेल व त्यात सुधारणा करु शकेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेला संबोधित केले. आपल्या संबोधनात, त्यांनी कोरोना विषाणू आणि लॉकडाऊन यावर जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणात भारत-चीन तणावावर काही चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण तसे झाले नाही. मोदींनी आपल्या भाषणात चीनचा उल्लेख केला नसल्याने कॉंग्रेसने पंतप्रधानांवर निशाणा साधला  आहे.

हे वाचा- शरद पवारांवर आणखी एका काँग्रेस नेत्याचा घणाघात, चीन प्रश्नावरून लगावला टोला चीनवर टीका करण्याची गोष्ट विसरा, त्यांना आपल्या राष्ट्रीय भाषणात चीनचा उल्लेख करण्यास भीती वाटते, असं ट्विट काँग्रेसने केलं आहे. कॉंग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर चीनविषयी एक छायाचित्रही पोस्ट केलं आहे. त्यावर लिहिलं आहे की, चीनने 423 मीटरपर्यंत भारताच्या सीमेत घुसखोरी केली आहे. कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार 25 जूनपर्यंत चीनच्या सीमेवर 16 तंबू आणि टर्पॉलिन आहेत. चीनमध्ये मोठा निवारा आहे, तसेच जवळपास 14 वाहने आहेत. पंतप्रधान ते नाकारू शकतात का, असा सवाल कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसने असेही म्हटले आहे की, भारताला अशा नेत्याची गरज आहे जो अपयशाचा स्वीकार करेल व त्यात सुधारणा करु शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या