JOIN US
मराठी बातम्या / देश / Shivsena Vs Shinde : सत्तासंघर्षावर पुन्हा तारीख पे तारीख, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला

Shivsena Vs Shinde : सत्तासंघर्षावर पुन्हा तारीख पे तारीख, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे

जाहिरात

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जानेवारी : शिवसेना कुणाची? या एका प्रश्नाभोवती गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील सत्तानाट्याचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणावर आता 141 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली.  सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम आर शाह सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचुड. न्यायमूर्ती क्रिष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती पी. एस नरसिंम्हा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.  ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद  केला. तर बाळासाहेबांची ठाकरे पक्षाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. सुनावणी दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात संदर्भात आता 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. सात सदस्य घटनापीठाला आमचा विरोध आहे असे स्पष्ट मत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वकील निहाल ठाकरे यांनी सांगितलं. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडले. 40 आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि भाजपच्या मदतीने सरकार देखील स्थापन केले. मात्र हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार, हे मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते. (भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का? मु्ख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बॅनरबाजी) सत्तासंघर्षप्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागील सुनावणीत केली होती. त्यामुळे या मागणीवर आज निर्णय होण्याची शक्यता होती. पण आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे गेलं आहे. त्यामुळे केस लांबणीवर पडली आहे. काय आहे वाद? आपण शिवसेना सोडलेली नसून आपला गटच खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आपल्याच गटाला मिळावे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने एका याचिकेद्वारे निवडणूक आयोगाकडे केला आहे. ( (‘शरद पवार नाहीतर भाजपचं हे स्वप्न होतं’, संजय राऊतांनी केलं गिरीश महाजनांचं अभिनंदन) ) मात्र, शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या