Nagpur: Rashtriya Swaysevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat addresses during the inaugural function of 7th International Principal's Education Conference (IPEC) 2019, in Nagpur, Maharashtra, Tuesday, Nov. 19, 2019. (PTI Photo)(PTI11_19_2019_000112B)
नवी दिल्ली, 18 जानेवारी : देशातील वाढती लोकसंख्या हा सध्या चिंते चा विषय झाला आहे. त्यामुळे दोनच मुलं जन्माला घालण्याचा कायदा करण्यात यावा, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे संघाच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. भविष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात दोन मुलं जन्माला घालण्याच्या कायद्यासाठी आग्रही असेल असेही ते यावेळी म्हणाले. भागवतांच्या या विधानावरुन लोकसंख्या नियंत्रण हा मुद्दा संघाच्या अजेंड्यावर असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र मोहन भागवतांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे. यावेळी मोहन भागवतांनी CAA वरही मतप्रदर्शन केलं आहे. देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन वादंग सुरू असताना मोहन भागवतांकड़ून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही, असं भागवतांनी यावेळी म्हटलं आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यातही भागवतांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद वाढला होता. देशातील 130 कोटी जनता हिंदूच आहे, असं वक्तव्य मोहन भागवतांनी केलं होतं. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याची प्रतिक्रिया येत होती. देशात दोनच मुलं जन्माला घालण्य़ाचा कायदा करायला हवा या वक्तव्यावर विविध पक्षाचे लोक काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.