मुंबई, 15 जुलै: रिलायन्स इंडस्ट्रीजची आज ऑनलाइन 43 वी वार्षिक सभा होत आहे. या सभेत मुकेश अंबानी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. या घोषणांकडे व्यवसायिक आणि नागरिकांचं लक्ष लागलं आहे. जिओसंदर्भातही कोणत्या घोषणा होतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच ही सभा ऑनलाइन स्वरुपात होत आहे.