डिब्रूगड (आसाम), 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आसाममध्ये एकामागून एक चार बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिब्रूगडमध्ये दोन स्फोट घडले तर एक सोनारी येथे आणि दुसरा पोलीस स्टेशनजवळील दुलियाजन येथे घडला आहे. सध्या या स्फोटांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही. आज भारताच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. आसाममधील डिब्रूगडमधील राष्ट्रीय महामार्ग 37 वरील दुकानाजवळ हा बॉम्बस्फोट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस आणि अन्य सुरक्षा अधिकारी घटनास्थळी दाखल असून पुढील तपास सुरू आहे. त्याचवेळी आसामचे डीजीपी भास्कर ज्योती महंत यांनी सांगितले की, ‘आम्हाला दिब्रूगडमधील स्फोटांची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून यात कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे.
Live: लडाखमध्ये 17 हजार फूट उंच फडकवला तिरंगा, राजपथावर दिसणार देशाचे शौर्य