JOIN US
मराठी बातम्या / देश / लॉकडाऊनमध्ये सूट देण्यासाठी PM मोदींनी का निवडली 20 एप्रिल ही तारीख? हे आहे कारण

लॉकडाऊनमध्ये सूट देण्यासाठी PM मोदींनी का निवडली 20 एप्रिल ही तारीख? हे आहे कारण

नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 20 एप्रिलचा मुहूर्त का निवडला, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. मात्र त्यामागील कारणही तसंच आहे.

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 एप्रिल : जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी भारताचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र तरीही कोरोनाबाधितांची संख्या अजूनही वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता 3 मे पर्यंत देशभरात लॉकडाऊन असणार आहे. नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना मांडलेले मुद्दे महत्त्वपूर्ण आहेत. ‘गरिबांसाठी, हातावर पोट असणाऱ्यांसाठी या लॉकडाऊनमध्ये 20 एप्रिलनंतर सुरक्षितता असेल त्या ठिकाणी सवलत देण्यात येईल. रब्बीची पीक काढणी सुरू आहे. त्यावर परिणाम होऊ नये म्हणून उपाययोजना केली आहे. पण बेजबाबदारपणा केला तर सवलती काढून घेण्यात येतील, असं नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 20 एप्रिलचा मुहूर्त का निवडला, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. मात्र त्याला कारणही तसंच आहे. आजपासून 20 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे नियम आणखी कडक केले जाणार आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले. मोदींनी ही भूमिका घेण्यामागे आहे तज्ञांनी दिलेला इशारा. कारण 15 ते 20 एप्रिलपर्यंत भारतात कोरोना संसर्ग झालेले लोक मोठ्या प्रमाणात समोर येईल शकतात, असा तज्ञांचा दावा आहे. याच पार्श्वभूमीवर 20 एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यसाठी सरकारने पाऊलं उचलली आहेत. लॉकडाऊनची घोषणा करताना नक्की काय म्हणाले नरेंद्र मोदी? भारतीयांची कोरोनाविरोधात लढाई सुरू जनतेनं मोठ्या कष्टाने देशाला वाचवलंय लोक जो संयम दाखवत आहे तो प्रेरणादायी इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाला रोखण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचे आपण सर्व साक्षीदार कोरोनाची एकही केस नव्हती तेव्हापासून एअरपोर्टवर स्क्रीनिंग करण्यात आले कोरोनाचे केवळ 550 रुग्ण होते तेव्हा भारताने 21 दिवसांचा लॉकडाऊन केला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या