JOIN US
मराठी बातम्या / देश / पोलीस सांगतात, खुनाचे पुरावे झाडाखाली ठेवले अन् माकडानं पळवून नेले; कोर्ट म्हणालं..

पोलीस सांगतात, खुनाचे पुरावे झाडाखाली ठेवले अन् माकडानं पळवून नेले; कोर्ट म्हणालं..

माकड खून प्रकरणातील पुरावे घेऊन पळून गेल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय. पोलिसांनी हे पुरावे चक्क झाडाखाली ठेवल्याचं सांगितलं आणि ते माकडाने तिथून पळवल्याची कहाणी सांगण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 4 मे : बिहार आणि यूपीमध्ये उंदरांची दारू पिऊन टाकल्याची पोलिसांची ‘थिअरी’ तुम्हाला माहीत झाली असेलच. किंवा झारखंडमध्ये उंदराने गांजा बाळगल्याबद्दलही तुम्ही ऐकलं असेल. आता माकडाची कमाल आहे. राजस्थानमधील एका खून प्रकरणात पोलीस पुरावे गोळा करत आहेत. आरोपींनाही अटक करत आहेत. पण, माकड खून प्रकरणातील पुरावे घेऊन पळून गेल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय. पोलिसांनी हे पुरावे चक्क झाडाखाली ठेवल्याचं सांगितलं आणि ते माकडाने तिथून पळवल्याची कहाणी सांगण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? हे प्रकरण राजस्थानमधील जयपूर येथील आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर 2016 मध्ये जयपूरच्या चांदवाजी भागात शशिकांत शर्मा नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. शशिकांत अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. संतप्त कुटुंबीयांनीही चौकशीची मागणी करत गोंधळ घातला. त्यांनी जयपूर-दिल्ली महामार्ग रोखून धरला होता. या गोंधळानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात खुनाचा अँगल समोर आला. खुनाच्या 5 दिवसांनंतर पोलिसांनी राहुल कंडेरा आणि मोहनलाल कंडेरा या दोन आरोपींनाही अटक केली होती. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्याने निरीक्षकालाही निलंबित करण्यात आलं होतं. हे वाचा -  विवाहित प्रेयसीच्या त्रासाने उचललं धक्कादायक पाऊल,आपल्या मुलीलाही पळवल्याचा आरोप न्यायालयाने नाराजी व्यक्त केली मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयपूरच्या खालच्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने पोलिसांकडे पुरावे मागितले. त्यानंतर पोलिसांनी लेखी जबाब नोंदवला. ज्यामध्ये चाकूसह एकूण 15 पुरावे जप्त केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, नंतर माकड हे पुरावे घेऊन पळून गेल्याचं सांगण्यात आले. हे पुरावे एका पिशवीत ठेवल्याचं पोलिसांनी सांगितलं. मालखान्यात जागा कमी असल्याने पोलीस ठाण्यात झाडाखाली ही पिशवी ठेवण्यात आली होती. तिथून ती घेऊन माकड पळून गेलं. हे वाचा -  राज ठाकरे भोंग्याच्या भूमिकेवर ठाम, जोधपूरमध्ये दगडफेकीतून तणाव.. TOP बातम्या पोलिसांच्या या अजब तर्कावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर पोलिसांकडून खुलासा घेऊन माहिती दिली जाईल, असं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. वकिलानं डीजीपी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून परिस्थिती स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी 4 मे रोजी होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या