JOIN US
मराठी बातम्या / देश / 'राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत; त्यांनी डेमो पाहावा' व्हेंटिलेटरच्या आरोपांवर कंपनीचं प्रत्युत्तर

'राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत; त्यांनी डेमो पाहावा' व्हेंटिलेटरच्या आरोपांवर कंपनीचं प्रत्युत्तर

राहुल गांधी यांनी रुग्णांसाठी चांगल्या प्रतीचे व्हेंटिलेटर नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 जुलै : देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. अनेक ठिकाणी रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यातच राहुल गांधी यांनी रविवारी सरकारवर हल्ला चढविला. ते म्हणाले की, पीएम केअर्स फंडाचा वापर करीत कोविड - 19 रूग्णांसाठी कमी दर्जाचे व्हेंटिलेटर खरेदी केले जात आहेत. पीएम केअर्समधील अस्पष्टतेमुळे भारतीयांचे जीव धोक्यात येत आहे आणि निकृष्ट साहित्य खरेदी करण्यासाठी सार्वजनिक पैशांचा उपयोग केला जात आहे. त्याचवेळी व्हेंटिलेटर बनवणारी कंपनी अ‍ॅगवा व्हेंटीलेटरचे सह-संस्थापक प्रोफेसर दिवाकर वैश यांनी स्पष्टीकरण दिले. वैश म्हणाले की व्हेंटिलेटरशी संबंधित बातम्यांची तपासणी न करता राहुल गांधींनी रिट्वीट केले. पुढे ते म्हणाले की, राहुल गांधी डॉक्टर नाहीत, त्यांना व्हेंटिलेटर कसे तपासायचे हे माहित आहे.

हे वाचा- गोव्यातील डॉक्टरची माणुसकी; कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना ‘जादुची झप्पी’ ते म्हणाले की, भारतीय व्हेंटिलेटर्स कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाऊ नये ही आंतरराष्ट्रीय निर्मात्यांची इच्छा आहे. आणि म्हणूनच ते स्वदेशी प्रयत्न थांबवू पाहत आहेत. तर राहुल गांधी यांना हवे असल्यास, मी व्हेंटिलेटर कसे कार्य करते याचा डेमो देऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या