JOIN US
मराठी बातम्या / देश / पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला संबोधित करणार, सगळ्यांचं लागलं लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला संबोधित करणार, सगळ्यांचं लागलं लक्ष

देशात Unlock 2ची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर चीन सोबतचा सीमा वादही सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे.

जाहिरात

New Delhi: Prime Minister Narendra Modi addresses the nation on COVID-19 via a video link, in New Delhi, Tuesday, April 14, 2020. PM Modi announced extension of the ongoing lockdown till May 3.(PIB/PTI Photo)(PTI14-04-2020_000210B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 29 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी देशाला संबोधित करणार आहेत. दुपारी 4 वाजता ते देशवासियांशी संवाद साधतील. देशात Unlock  2ची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर चीन सोबतचा सीमा वादही सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे. रविवारी झालेल्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी नाव न घेता चीनला इशारा दिला होता. तर सोमवारीच सरकारने मोठा निर्णय घेत तब्बल 59 चिनी Appsवर बंदी घातली होती. कोरोना आणि नंतरचं लॉकडाउन या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने देशवासियांशी संवाद साधत असून त्यांनी याच माध्यमातून अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान,  Coronavirus वर नियंत्रण अजूनही मिळालेलं नसल्यामुळे अजूनही सार्वजनिक जीवनावर निर्बंध कायम असतील, असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून याची कल्पना दिलेली होती. आता केंद्राने औपचारिक घोषणा करत कुठल्या गोष्टींवर निर्बंध असतील, हे स्पष्ट केलं आहे. Unlock च्या पहिल्या टप्प्याप्रमाणे मेट्रो, मॉल, जिम यासह शाळा, कॉलेजही बंद राहतील, असं गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

1 जुलै ते 31 जुलै या काळात नाईट कर्फ्यू असेल. म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत संचाबंदी असेल. महाराष्ट्रात Unlock 2.0 ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारीच केली. पण म्हणजे नेमके कुठले व्यवहार खुले होणार आणि कुठले निर्बंध कायम राहणार याविषयी स्पष्टता आणणारा केंद्राचा आदेशही आता निघाला आहे.  Misshion Begin again ही योजना सुरू असली, तरी Coronavirus चा वाढता धोका लक्षात घेऊन प्रादुर्भाव वाढतो आहे त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन (maharashtra lockdown) लागू होणार आहे. 31 जुलैपर्यंत हे निर्बंध कायम असतील, हे स्पष्ट झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या