JOIN US
मराठी बातम्या / देश / पंतप्रधान मोदींनी बदलला प्रोफाईल Photo, स्वतःच्या फोटोऐवजी ठेवला हा फोटो

पंतप्रधान मोदींनी बदलला प्रोफाईल Photo, स्वतःच्या फोटोऐवजी ठेवला हा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आपला प्रोफाईल फोटो बदलला आहे.

जाहिरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो - Shutterstock)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज देशवासियांना संबोधित केलं आहे. भारत देशानं 100 कोटी कोरोना लसींच्या डोसचा टप्पा पार केल्यानिमित्त मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. मात्र या संबोधनापूर्वी मोदींनी आपला ट्विटरवरील प्रोफाईल फोटो (profile photo) बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रोफाईल फोटोमध्ये लिहिलं की, भारताचे अभिनंदन - 100 कोटी लसीचे डोस पूर्ण झालेत. मोदी आपल्या प्रोफाईल फोटोतून देशवासियांचं अभिनंदन करत आपल्या राष्ट्रध्वजाचे रंग तिंरगा देखील या फोटोमध्ये दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुक आणि ट्विटरवर त्यांचे प्रोफाईल फोटो बदलला आहे. या नव्या प्रोफाईल फोटोतून त्यांनी भारताचे अभिनंदन केलं आहे. हेही वाचा-   PM Narendra Modi: 100 कोटी लसीचे डोसचा विक्रम, 130 कोटी देशवासीयांचे यश: पंतप्रधान नरेंद्र मोदी इतंकच काय तर पंतप्रधानांनी फोनवर ऐकायला येणारी कोरोनासंदर्भातली कॉलर ट्यून सुद्धा बदलली आहे. आता तुम्हाला लसीकरण मोहिमेचा यशस्वी मेसेज ऐकायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनातील काही महत्त्वाचे मुद्दे हा एक बेंचमार्क आहे ज्याची सुरुवात पंतप्रधान मोदींनी 10 वाजता देशाचं अभिनंदन करून केली. ते म्हणाले, ‘काल भारताने 100 कोटी लसींची विक्रमी नोंद केली. आपल्या देशातील लोकांमुळे आपण हे यश मिळवलं आहे. मला सर्वांचे आभार मानायचे आहेत. भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची तुलना इतर देशांशी केली जात होती. हा एक बेंचमार्क आहे. 100 कोटींनी सर्व उत्तरे दिली असं म्हणत पंतप्रधान म्हणाले की ‘लस ​​संशोधन आणि विकास इतर देशांसाठी नवीन नाही. भारत इतर देशांकडून लस आयात करतो. सुरुवातीला, प्रश्न उपस्थित केले जात होते की भारत या साथीचा सामना करू शकेल का? लसीकरण होईल का? पुरेसे पैसे असतील का? पण या 100 कोटींच्या आकड्याने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आता भारत एक सुरक्षित ठिकाण मानले जाईल. हेही वाचा-  मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी नवी अपडेट,  NCB ची मोठी कारवाई VIP संस्कृतीचा अंत, लसीकरण मोहिमेबद्दल पंतप्रधान म्हणाले की, लसीमध्ये भेदभाव शक्य नाही. ते म्हणाले, ‘गरीब-श्रीमंत, गाव-शहर, दूरदूरचा, देशाचा एकच मंत्र आहे की जर महामारीनं भेदभाव केला नाही तर लसीमध्येही भेदभाव होऊ शकत नाही. व्हीआयपी संस्कृती लसीकरण मोहिमेवर वर्चस्व गाजवू नये याची खात्री करण्यात आली. मोफत संरक्षण 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात सरकारी केंद्रांवर नागरिकांना मोफत लस दिली जात होती. यावर पीएम मोदी म्हणाले, ‘भारताने आपल्या नागरिकांना 100 कोटी लसीचे डोस दिले आहेत आणि तेही पैसे न घेता. 100 कोटी लसींच्या डोसचा परिणाम असा होईल की आता जग भारताला कोरोनापेक्षा सुरक्षित समजेल. हेही वाचा-  पुणेकर खूश, अजित पवारांनी दिवाळी आधी दिलं मोठं गिफ्ट   व्होकल फॉर लोकलवर चर्चा देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी व्होकल फॉर लोकल या विषयावर भर दिला. ते म्हणाले, प्रत्येक लहान वस्तू, जी भारतात बनवली जाते, ज्याच्यासाठी भारतीय घाम गाळतो, ती खरेदी करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे आणि हे प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळेच शक्य होईल. भारतीयांनी बनवलेल्या वस्तू विकत घेण्यासाठी, स्थानिकांसाठी आवाज उठवण्यासाठी, आपल्याला हे व्यवहारात आणावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या