JOIN US
मराठी बातम्या / देश / मोदींचं मोठं वक्तव्य : 'आपल्या सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही'

मोदींचं मोठं वक्तव्य : 'आपल्या सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही'

चीनसोबत सुरू असलेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली. यात काँग्रेसह 20 पक्षांनी सहभाग घेतला.

जाहिरात

New Delhi: Prime Minister Narendra Modi addresses the nation on COVID-19 via a video link, in New Delhi, Tuesday, April 14, 2020. PM Modi announced extension of the ongoing lockdown till May 3.(PIB/PTI Photo)(PTI14-04-2020_000210B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली19 जून: चीनचं लष्कर भारताच्या हद्दीत घुसलेलं नाही, भारतीची कुठलीही पोस्ट त्यांनी बळकावली नाही असा सर्वात मोठा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. चीनचं लष्कर भारतीय हद्दीत घुसलं आहे. त्यांनी काही भारताच्या पोस्ट बळकावल्या आहेत असे आरोप होत होते. त्या सर्व आरोपांना पंतप्रधानांनी उत्तर सर्वपक्षीय बैठकीत उत्तर दिलं. भारताची एक इंच जमीन बळाविण्याचं धाडस कुणी करू शकत नाही असंही ते म्हणाले. देशाचं संरक्षण करण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. चीनसोबत सुरू असलेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली. यात काँग्रेसह 20 पक्षांनी सहभाग घेतला. पराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सर्व नेत्यांना घटनाक्रमाची माहिती दिली. बैठकीच्या सुरुवातीला सर्वच नेत्यांनी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान म्हणाले, भारताचे 20 शूर सैनिक शहीद झाले आहेत. त्यांचं बलिदान देश विसणार नाही. जमीन, आकाश आणि समुद्रात देशाच्या रक्षणासाठी जे करणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी लष्कर करत आहेत. त्यांना मोकळीक देण्यात आली आहे. देशांच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सीमा भागात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या बैठकीत काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली. सीमेवर जैसे थे परिस्थिती राहिल असं आश्वासन देशाला द्या असं त्या पंतप्रधानांना म्हणाल्या.

चीनच्या वादावर नेमकं काय सुरू आहे? सध्या काय चाललं आहे? हे आम्हा विरोधीपक्षांना काहीही माहित नाही. त्याची वळोवेळी माहिती दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षांना पूर्णपणे अंधारात ठेवलं गेलं असंही त्या म्हणाल्या. ही सर्वपक्षीय बैठक आधीच घ्यायला पाहिजे होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

जाहिरात

चीनच्या वादावर नेमकं काय सुरू आहे? सध्या काय चाललं आहे? हे आम्हा विरोधीपक्षांना काहीही माहित नाही. त्याची वळोवेळी माहिती दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षांना पूर्णपणे अंधारात ठेवलं गेलं असंही त्या म्हणाल्या. ही सर्वपक्षीय बैठक आधीच घ्यायला पाहिजे होती असं मतही सोनिया गांधींनी व्यक्त केलं. संपादन - अजय कौटिवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या