JOIN US
मराठी बातम्या / देश / राष्ट्रपतींनी जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीला दिली मंजुरी

राष्ट्रपतींनी जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीला दिली मंजुरी

जम्मू-काश्मीरमधील महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळ्यानंतर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपाल राजवटीला मंजुरी दिली आहे.

जाहिरात

**FILE PHOTO** Jammu: In this file photo dated February 17, 2017, J & K Governor NN Vohra is seen with Chief Minister of J & K Mehbooba Mufti after a swearing-in ceremony at the Governor House in Jammu. BJP on Tuesday, June 19, 2018, pulled out of the PDP-BJP alliance government in Jammu and Kashmir. (PTI Photo)(PTI6_19_2018_000076B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जम्मू-काश्मीर, 20 जून : जम्मू-काश्मीरमधील महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळ्यानंतर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपाल राजवटीला मंजुरी दिली आहे. खरंतर, भाजप आणि पीडीपीची युती तुटल्यानंतर इथं नवं सरकार येणं शक्य नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. पण या दरम्यान दुसऱ्या कोणतंही सरकार पीडीपीसोबत युती करण्यासाठी तयार नाही आहेत. त्याचबरोबर भारताच्या अन्य राज्यांप्रमाणे काश्मीरमध्ये  राष्ट्रपती सरकार चालवू शकत नाही.

हेही वाचा…

मोदी सरकारच्या काळात सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनात २०० पटींनी वाढ

भाजप जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर, मेहबुबा मुफ्ती देणार राजीनामा!

भारताच्या अन्य राज्यात अशी परिस्थिती ओढल्यास तिथे राष्ट्रपती सरकार चालवू शकतात पण काश्मीरमध्ये राष्ट्रपती नाही तर राज्यपाल सरकार चालवतात.

त्यामुळे आता विद्यमान राज्यपाल एन.एन वोहरा हे जम्मू काश्मीरचं सरकार चालवणार आहे. पण दरम्यान वोहरा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. पण अशा परिस्थितीत एन.एन. वोहरा यांचा कार्यकाळ किमान 3 महिने विस्तारू शकतो अशी चर्चा आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये काय आहेत पर्याय?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या