S M L

जम्मू आणि काश्मीरमध्ये काय आहेत पर्याय?

मेहबुबा मुफ्ती यांना सरकार टिकावायचं असेल तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचा पाठिंबा घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत मर्यादित पर्याय मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे आहेत.

Ajay Kautikwar | Updated On: Jun 19, 2018 03:53 PM IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये काय आहेत पर्याय?

नवी दिल्ली,ता.19 जून : जम्मू आणि काश्मीरमधल्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्याने राज्यात राजकीय अस्थिरती निर्माण होणार आहे. मेहबुबा मुफ्ती यांना सरकार टिकावायचं असेल तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचा पाठिंबा घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत मर्यादित पर्याय मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे आहेत.

जम्मू आणि काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असून परिस्थिती नियंत्रणात राखण्यास राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप राम माधव यांनी केला. अशा परिस्थितीत सरकारमध्ये राहणं भाजपला शक्य नाही. त्यामुळे देशहिताचा विचार करता भाजपने पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतल्याचं राम माधव यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर लष्कराने शस्त्रसंधी केली होती. मात्र त्याला हुर्रियत आणि इतर संघटनांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आता लष्कराची कारवाई पुन्हा सुरू होणार आहे.

सत्तेची संभाव्य समीकरणं

एकूण जागा - 87

Loading...
Loading...

बहुमतासाठीचं संख्याबळ - 44

पीडीपी - 28

बीजेपी -25

काँग्रेस - 12

नॅशनल काँन्फरन्स - 15

इतर - 7

पर्याय 1

नॅशनल काँन्फरन्स काँग्रेस पीडीपी

पर्याय 2

सहा महिने राष्ट्रपती राजवट

पर्याय 3

सहा महिन्यांनंतर मध्यवर्ती निवडणुका

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2018 03:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close