Pune: Barricades are seen at Khadki Cantonment after seven family members of a COVID-19 positive patient tested positive for the coronavirus infection during a nationwide lockdown in the wake of coronavirus pandemic, in Pune, Saturday, April 18, 2020. (PTI Photo)(PTI18-04-2020_000124B)
नवी दिल्ली, 30 एप्रिल : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी देशात 3मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान 4 दिवसांनी लॉकडाऊनबाबत काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. लॉकडाऊन वाढणार की नाही याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसली तरी गृह मंत्रालयानं 3 मेनंतर ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन परिसरांमध्ये काही सूट देण्यात येतील, असे संकेत दिले आहे. लवकरच याबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येईल. या भागांमध्ये मिळणार सूट लॉकडाऊनबाबतच्या मार्गदर्शक सूचना नंतर प्रसिद्ध केल्या जातील. परंतु असे म्हटले जात आहे की गेल्या 28 दिवसांपासून कोरोनाचे एकही प्रकरण समोर न आलेल्या परिसरांना सूट मिळू शकते. त्याशिवाय गेल्या 14 दिवसांत कोरोनाची कोणतीही नवीन प्रकरणे नसलेल्या क्षेत्रावरील काही निर्बंध हटवले जाऊ शकतात. याशिवाय रेड झोनमध्येही काही सूट मिळू शकते. परंतु याक्षणी हॉटस्पॉट झोनमध्ये कोणतीही सूट देण्यात येणार नाही आहे.
3 मेपर्यंत निर्बंध लॉकडाऊन संदर्भात बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. गृह मंत्रालयाचे ट्विट करून असे म्हटले आहे की लॉकडाऊनचा देशाला मोठा फायदा झाला आहे आणि परिस्थिती वेगाने सुधारत आहे. असेही म्हटले आहे की लॉकडाऊनचे फायदे हाताबाहेर जात नाहीत, म्हणून आम्हाला 3 मे पर्यंत काटेकोरपणे त्याचे पालन करावे लागेल. महानगरांमध्ये सूट नाही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि चेन्नई यांसारख्या परिसरांमध्ये सूट देण्यात येणार नाही. या शहरांमध्ये अनेक रेड झोन आणि हॉटस्पॉट क्षेत्र आहेत. मात्र काही दुकानांना परवानगी दिली जाऊ शकते. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.