JOIN US
मराठी बातम्या / देश / कोणी अधिकारी तर कोणी हवालदार बनलं; भामट्यांनी थेट नकली पोलीस स्टेशनच थाटलं, धक्कादायक कारण समोर

कोणी अधिकारी तर कोणी हवालदार बनलं; भामट्यांनी थेट नकली पोलीस स्टेशनच थाटलं, धक्कादायक कारण समोर

या छाप्यात पोलिसांनी नकली पोलिसांच्या वर्दीमध्ये असलेल्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचबरोबर एका युवतीलाही अटक केली आहे. तिचं नाव अनिता देवी असं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 18 ऑगस्ट : पोलीस असल्याचं दाखवत फसवणूक करून नागरिकांकडून पैसे उकळण्याचं काम करणाऱ्या नकली पोलिसांबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. मात्र, आता एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात थेट नकली पोलीस स्टेशनच उभारण्यात आलं होतं. बिहारमधील बांका गावात पोलिसांनी केलेल्या छापेमारीत ‘कर’ शहरातील अनुराग गेस्ट हाउसमध्ये बेकायदेशीरपणे पोलीस स्टेशन चालवलं जात असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या नकली पोलीस स्टेशनवर धाड टाकली आणि त्याचा पर्दाफाश केला. रिल्स बनविण्यासाठी हवा होता मोबाईल, अल्पवयीन मुलाने थेट महिलेवरच.. आरोपीला बेड्या या छाप्यात पोलिसांनी नकली पोलिसांच्या वर्दीमध्ये असलेल्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचबरोबर एका युवतीलाही अटक केली आहे. तिचं नाव अनिता देवी असं आहे. तिच्या जवळ दोन गावठी पिस्तुल सापडल्या आहेत. तिने सांगितलं की ते पिस्तुल तिला वरिष्ठ आधिकाऱ्यांनी चालवायला शिकण्यासाठी दिले आहेत. तिने दावा केला की झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या आदेशानुसार त्यांनी हे स्टेशन स्थापन केलं आहे. याबाबत बांका पोलिसांनी सांगितलं की, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले होते. छापा टाकून ते पोलीस ठाण्यात परतत असताना, बांका गेस्ट हाऊससमोरील रस्त्यावर एक अनोळखी महिला आणि तरुण पोलीस वेशात दिसले. त्यांच्याकडे संशयाच्या आधारे चौकशी केली असता, बनावट पोलीस ठाण्याचं प्रकरण समोर आलं. एसएचओंनी सांगितलं की, अटक करण्यात आलेली महिला अनिता स्वत:ला पोलीस अधिकारी म्हणवत होती आणि ती बिहार पोलिसांच्या पूर्ण ड्रेसअपमध्ये होती. चित्रपटालाही लाजवेल इतका भयानक घटनाक्रम, प्रसिद्ध व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं? सांगली जिल्हा हादरला तिच्या कामाबद्दल अनिताने सांगितलं की, जिथे जिथे सरकारी घरे बांधली गेली, तिथे ती चौकशी करायला जायची. एसएचओंच्या म्हणण्यानुसार, या कार्यालयात रुजू झालेल्या सर्व कर्मचार्‍यांना पोलिसांचा गणवेश आणि बेकायदेशीर पिस्तूल पुरवण्यात मुख्य गुंड म्हणून फुलिदुमरच्या भोला यादवचे नाव पुढे येत आहे. एसपीच्या म्हणण्यानुसार, या टोळीशी संबंधित लोक ग्रामीण भागातील लोकांना पोलिसात नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करायचे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. सध्या बांका पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई सुरू करून एफआयआर नोंदवण्याची तयारी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या