न्यूयॉर्क, 27 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केलं. दहशतवाद ही जगासमोरची मोठी समस्या आहे,असं मोदी पाकिस्तानचं नाव न घेता म्हणाले. दहशतवादाविरुद्ध अवघ्या जगाला एक व्हावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं.दहशतवाद ही एका देशासमोरची समस्या नाही हेही मोदींनी ठणकावून सांगितलं. महात्मा गांधींनी दिलेला अहिंसा आणि शांतीचा संदेश जगासाठी मोलाचा आहे, असंही ते म्हणाले. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेही संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण करणार आहेत. त्याआधी अमेरिकेने पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. मसूद अझर आणि हाफीज सईद या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करा, या दोन दहशतवाद्यांच्या विरोधात खटले चालवा, असं अमेरिकेने म्हटलं आहे.
पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी गांभिर्याने कारवाई केली पाहिजे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम राहण्याचं हे मुख्य कारण आहे, असंही अमेरिकेने म्हटलं. भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर अमेरिकेची मध्यस्थी नको, असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या निमित्ताने हो दोन नेते एकत्र आले आहेत. मोदींच्या भाषणानंतर आता इम्रान खान यांच्या भाषणाकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. ते काश्मीरच्या मुद्द्यावर काही बोलतात का याबदद्ल उत्सुकता आहे. ======================================================================================== अजितदादांनी सुनेत्रा पवारांना फोनवर दिला होता निरोप, पाहा हा VIDEO