नवी दिल्ली, 17 जानेवारी - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीच्या प्रमुख रिटायर्ड जस्टिस इंदू मल्होत्रा(Retired Justice Indu Malhotra) यांना धमकी मिळाली आहे. खालिस्तानी फुटीरतावाद्यांनी (Khalistan Separatists) इंदू मल्होत्रा यांना धमकी दिली आहे. इंदू मल्होत्रा यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करू देणार नाही, असं सिख फॉर जस्टिस (SFJ) या खालिस्तानी फुटीरतावादी संघटनेनं म्हटलं आहे. इंदू मल्होत्रा या समितीच्या चेअरपर्सन आहेत. माजी न्यायमूर्ती मल्होत्रा यांच्यासह अनेक वकिलांना संघटनेनं एक व्हॉइस नोट पाठवली आहे. या व्हॉइस नोटमध्ये म्हटलं, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) माजी न्यायाधीश मल्होत्रा यांना करू देणार नाही. पीएम मोदी आणि शिख नागरिक यांच्यापैकी एकाला निवडावे लागेल.
UP Chunav: युपीत भाजपचा मोठा डाव! 60% ओबीसी-दलित उमेदवार, कोणत्या जातीला किती तिकिटं, कसं आहे जातीय समीकरण?आम्ही सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची एक यादी बनवत आहोत. यापूर्वीसुद्धा सुप्रीम कोर्टाच्या अनेक वकिलांना या प्रकरणी धमकीचे कॉल आलेले आहेत.
वकिलांनाही आले धमकीचे कॉल सुप्रीम कोर्टाच्या 50 हून अधिक वकिलांना इंटरनॅशनल नंबरवरून कॉल आले होते. या कॉलमध्ये दावा करण्यात आला की, पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होण्यास ते (कॉल करणारे) जबाबदार आहेत. सत्ता येताच मोफत वीज-पाणी-शिक्षण, बेरोजगारांना 3000 रुपये, केजरीवालांची घोषणा करणाऱ्यांनी सिख फॉर जस्टिस (Sikh for Justice)या संघटनेशी संबंधित असल्याचा दावा केला होता. सुप्रीम कोर्टाच्या सर्व AOR (Advocate-on-Record) वकिलांना फोन करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर, सुप्रीम कोर्टाच्या जजना पीएम मोदी यांच्या सुरक्षेतील चूक झाल्याच्या याचिकांवर सुनावणी करू नये यासाठीसुद्धा धमकावण्यात आले होते.