नवी दिल्ली, 01 जुलै : गेले काही दिवस इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Assosiation) आणि योगगुरू रामदेव बाबा (Yoga guru Ramdev Baba) यांच्यातील वाद चांगलात चर्चेत होता. अजूनही हा वाद कायम आहे. पण याचदरम्यान आज डॉक्टर्स दिनानिमित्त (Doctor’s Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयएमएला (IMA) योगावर (Yoga) अभ्यास करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएमएला योगा, त्याचे फायदे याबाबत संशोधन करण्याची विनंती केली आहे. डॉक्टर जेव्हा योगावर शोध करतात तेव्हा जगही त्याला गांभीर्यानं घेतं. आयएमए अशा स्टडीला मिशन मोडमध्ये पुढे नेऊ शकतात, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. विनय अग्रवाल म्हणाले, “यात काहीही मतभेद नाहीत. योग इन्स्टिट्यूट बनवण्यात आले आहेत. योगाला नव्या विज्ञानाचा दर्जा देण्यात आला आहे. आयुष मंत्रालयसुद्धा आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मी तर म्हणतो सरकारमार्फत निधीची तरतूद करून यासंबंधित विज्ञानाला प्रमोट करायला हवं” हे वाचा - ‘तुम्ही देवासारखं काम केलं’, पंतप्रधान मोदींनी मानले डॉक्टरांचे आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स दिनानिमित्त देशातील डॉक्टरांशी संवाद साधला. त्यावेळी सर्वात आधी त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. मोदी म्हणाले, “मला भारतातील सर्व नागरिकांच्या वतीने सर्व डॉक्टरांचे आभार मानायचे आहेत. आज देश कोरोनासारखा मोठा लढा देत आहेत. डॉक्टर्स दिवसरात्र मेहनत करून लाखो लोकांचं जीवन वाचवत आहेत. डॉक्टरांना ईश्वराचं दुसरं रूप म्हटलं जातं ते असंच नाही” “पुण्य कार्य करताना देशातील किती तरी डॉक्टरांनी आपलं जीवनही गमावलं आहे. मी त्यांना श्रद्धांजली अपर्ण करतो. त्यांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो”, असं मोदी म्हणाले. हे वाचा - डॉक्टरांना असंख्य आव्हानांना द्यावं लागतं तोंड, असा असतो खडतर प्रवास डॉक्टरांचं ज्ञान आणि अनुभव यामुळे कोरोनाव्हायरसशी लढण्यात मदत मिळते आहे. आपला देश कोरोनाविरोधी लढा जिंकणार आणि विकासाचं एक नवं ध्येय गाठणार, असा विश्वा त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोना नियमांचं पालन आणि लसीकरण याबाबत अधिक सक्रिय भूमिका निभावण्याचं आवाहनही मोदींनी डॉक्टरांना केलं आहे. तसंच आरोग्य क्षेत्राचं बजेटही दुप्पट केल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.