हैदराबाद, 25 जून : जगभरामध्ये प्लॅस्टिकची समस्या खूपच गंभीर बनली आहे. प्लॅस्टिकचं विघटन कसं करायचं, प्लॅस्टिकला पर्याय काय यावर सगळीकडे महत्त्वाचं संशोधन सुरू आहे. हैदराबादचे एक प्राध्यापक सतीशकुमार यांनी प्लॅस्टिकपासून पेट्रोल बनवण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. प्रदूषण होत नाही मेकॅनिकल इंजिनिअर असलेले सतीशकुमार हे मूळचे हैदराबादचे निवासी आहेत. प्लॅस्टिकपासून पेट्रोल बनवण्याच्या प्रक्रियेला त्यांनी पायरोलिसिस असं नाव दिलं आहेत. प्लॅस्टिक अप्रत्यरित्या गरम करून त्याचं विघटन केलं जातं आणि त्याचं रूपांतर पेट्रोलमध्ये होतं. ही सगळी प्रक्रिया निर्वात पोकळीमध्ये केली जाते. त्यामुळे हवेचं प्रदूषणही होत नाही. सतीश कुमार यांनी या संशोधन आणि प्रयोगासाठी हायड्रॉक्सी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने एक कंपनी बनवली आहे. या कंपनीमध्ये प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून डिझेल, विमानाचं इंधन आणि पेट्रोल बनवलं जातं. प्लॅस्टिकचा पुनर्वापर सतीशकुमार यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 500 किलो प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून 400 लिटर पेट्रोल बनवलं जाऊ शकतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जसं वायू प्रदूषण होत नाही तसंच पाणीही लागत नाही. सतीशकुमार यांनी आतापर्यंत 50 टन प्लॅस्टिकचं पेट्रोलमध्ये रूपांतर केलं आहे. ते दररोज 200 किलो प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून 200 लिटर पेट्रोल बनवतात. हे पेट्रोल ते स्थानिक व्यापाऱ्यांना विकत असतात. पण हे पेट्रोल वाहनांसाठी किती उपयोग आहे याच्या चाचण्या होणं बाकी आहे. पर्यावरण रक्षणाचा उद्देश पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानेच आपण प्लॅस्टिकपासून पेट्रोलचा हा प्रयोग सुरू केला, असं सतीशकुमार सांगतात. यामागे कोणताही व्यावसायिक उद्देश नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या प्रयोगाच्या चाचण्या यशस्वी झाल्या तर वाहनांमध्येही हे पेट्रोल वापरता येईल. ============================================================================================== SPECIAL REPORT: आगीचा खेळ, अस्वलाचे हाल