JOIN US
मराठी बातम्या / देश / पेट्रोलला मागे टाकत डिझेलनं गाठली ऐंशी! हे आहेत मुंबई ते दिल्ली आजचे दर

पेट्रोलला मागे टाकत डिझेलनं गाठली ऐंशी! हे आहेत मुंबई ते दिल्ली आजचे दर

19व्या दिवशी दिल्लीमध्ये डिझेल 14 पैशांनी तर पेट्रोल 16 पैशांनी महाग झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जून : इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल जास्त महाग झालं आहे. पेट्रोलला मागे टाकत डिझेलनं ऐंशी गाठल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई ते दिल्ली सगळ्या शहरांमध्ये जवळपास डिझेल वाढलं आहे. सलग 19व्या दिवशी दिल्लीमध्ये डिझेल 14 पैशांनी तर पेट्रोल 16 पैशांनी महाग झालं आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर दिल्ली- डिझेल 80.0 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 79.92 रुपये प्रति लिटर मुंबई- डिझेल 78.34 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 86.70 रुपये प्रति लिटर कोलकाता - डिझेल 75.18 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 81.61 रुपये प्रति लिटर चेन्नई-डिझेल 77.29 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 83.18 रुपये प्रति लिटर बंगळुरू-डिझेल 76.09 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 82.52 रुपये प्रति लिटर लखनऊ-डिझेल 72.4 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 80.59 रुपये प्रति लिटर

संबंधित बातम्या

पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आणि दररोज त्याची समीक्षा केली जाते. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता. देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. त्याच वेळी, आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या