JOIN US
मराठी बातम्या / देश / ‘POK मधल्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ल्यासाठी Indian Air Force तयार’

‘POK मधल्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ल्यासाठी Indian Air Force तयार’

‘ज्या ज्या वेळी दहशतवादी हल्ला होईल त्यानंतर पाकिस्तानने काळजी केलीच पाहिजे. त्यांना चिंतामुक्त राहायचे असेल तर त्यांनी दहशतवाद्यांना खतपाणी घालणं बंद केलं पाहिजे.’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली18 मे: पाक व्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प नष्ट करण्यासाठी भारतीय हवाईल तयार असल्याचं मत हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी व्यक्त केलं. अशा कारवाईसाठी हवाई दल 24 x7 तयार असते असंही ते म्हणाले. हंदवाडा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान चिंतेत आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या ज्या वेळी दहशतवादी हल्ला होईल त्यानंतर पाकिस्तानने काळजी केलीच पाहिजे. त्यांना चिंतामुक्त राहायचे असेल तर त्यांनी दहशतवाद्यांना खतपाणी घालणं बंद केलं पाहिजे असा इशारा त्यांनी दिला. जम्मू आणि काश्मीरमध्ये हंदवाडा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 5 जवान शहीद झाले होते. त्यानंतर पाकिस्तानला भारताच्या हल्ल्याची भीती वाटत होती. त्यानंतर त्यांनी लढाऊ विमानांच्या मदतीने सीमेवर गस्तही सुरू केली होती.

संबंधित बातम्या

पाकिस्तानचे (Paskitan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनाही गेल्या काही दिवसांपासून भारताकडून भीती वाटत आहे. ही भीती आहे, भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक (Surgical Strike) किंवा एअर स्ट्राइक करेल याची. एकीकडे पाकमध्ये कोरोनानं थैमान घातले आहे तर, दुसरीकडे गरिबी आणि उपासमारीनं लोकांचा मृत्यू होत असताना इम्रान खान यांनी जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी अनेक ट्व्टिस करत भारतावर आरोप केलेत. जगातल्या या देशांमध्ये कोरोनाचा दुसरा उद्रेक होणार, शास्त्रज्ञांचा इशारा इम्रान खान आपला वेळ भारतविरोधी प्रॉपागेंडा पसरवण्याचे काम करत आहेत. इम्रान यांनी रविवारी इस्लामाबादमधील काश्मीरमध्ये दहशतवादाचे समर्थन करत पाकविरुद्ध ‘छळ मोहीम राबविण्याची’ संधी निर्माण केली जात असल्याचा आरोप भारतावर केला होता. इम्रान यांनी पुन्हा ट्विटरवर आरोप केला की भारत सरकार काश्मिरींना आत्मनिर्णयनाच्या हक्कापासून दूर ठेवू इच्छित आहे. सलाम! 78 वर्षांची कोरोना योद्धा, सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून दिला शेवटचा निरोप भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार काश्मिरींना मिळालेल्या आत्मनिर्णयनाच्या अधिकारासाठी संघर्षाला पाक समर्थित दहशतवादाच्या रुपात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं पाकिस्तानविरुद्ध ‘छळ मोहीम’ राबवण्याची संधी मिळेल आणि जगाचे लक्ष काश्मीरमधून वळवले जाईल, असे आरोप इम्रान यांनी ट्वीटच्या मालिकेत केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या