JOIN US
मराठी बातम्या / देश / अखेर पाकिस्तानने मान्य केलं, भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद राहतो कराचीतल्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये

अखेर पाकिस्तानने मान्य केलं, भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद राहतो कराचीतल्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये

या आधी भारताने अनेकदा पुरावे देऊन दाऊद हा पाकिस्तानमध्ये राहत असल्याचं सांगितलं होतं. मात्र पाकिस्तानने ते नाकारलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इस्लामाबाद 22 ऑगस्ट: भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हा कराचीत राहत असल्याचं अखेर पाकिस्तानने मान्य केलं आहे. पाकिस्तानने 88 दहशतवादी आणि संघटनांची यादी जाहीर केली त्यात दाऊदचं नाव असून त्याचा पत्ता हा कराची व्हाईट हाऊस असा लिहिला आहे. त्यामुळे भारताच्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. UNने आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांची यादी प्रसिद्धी केल्यानंतर पाकिस्तानने आर्थिक प्रतिबंधांपासून वाचण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान या सर्व दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांवर कडक आर्थिक प्रतिबंध लादणार आहे. दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) याच्यासोबतच हाफिज सईद (Hafiz Saeed) आणि मसूद अजहर (Masood Azhar) यांचाही यात समावेश आहे. दहशतवादांना मदत करणाऱ्या देशांवर FATF ही आंतरराष्ट्रीय संघटना लक्ष ठेवत असते. त्या संघटनेने पाकिस्तानला ग्रे यादीत टाकलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पत खालावली होती. जागतिक वित्तीय संस्था मदतही करत नव्हत्या. त्यामुळे त्या यादीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला ही कृती करावी लागली.

संबंधित बातम्या

या आधी भारताने अनेकदा पुरावे देऊन दाऊद हा पाकिस्तानमध्ये राहत असल्याचं सांगितलं होतं. मात्र पाकिस्तानने त्याचा कायम इन्कार केला आहे. आता पाक सरकारने घोषीत केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतच दाऊदचं नाव असल्याने भारताच्या दाव्याला बळ मिळालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या