JOIN US
मराठी बातम्या / देश / या झोनमध्ये राहणाऱ्यांसाठी Online Shopping सुरू; खरेदी करू शकता मोबाईल, फ्रिज, एसी

या झोनमध्ये राहणाऱ्यांसाठी Online Shopping सुरू; खरेदी करू शकता मोबाईल, फ्रिज, एसी

नवीन नियमांतर्गत, रेड झोनमधील ई-कॉमर्स कंपन्या अजूनही केवळ आवश्यक वस्तू पुरवू शकतात. पण ग्रीन आणि ऑरेंज दोन्ही भागात अत्यावश्यक आणि अनावश्यक वस्तू पुरवल्या जाऊ शकतात.

जाहिरात

जर तुमच्या खिशात आता फक्त १५० रुपये आहेत आणि तुम्हाला शॉपिंग करायची आहे. तर तुमच्याकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. कारण १५० रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठीही तुमच्याकडे हजारो पर्याय आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 मे : ई-कॉमर्स (E-commerce)कंपन्यांना लॉकडाऊन दरम्यान लॅपटॉप (लॅपटॉप, मोबाईल) ऑरेंज झोन (orange zone)आणि ग्रीन झोनमध्ये (green zone )लॅपटॉप(laptop) मोबाईल (mobile) आणि रेफ्रिजरेटर्स (fridge) सारख्या अनावश्यक वस्तू देण्याची सूट देण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. या कंपन्यांनी असं म्हटलं आहे की, यामुळे लाखो लघु व मध्यम उद्योग व व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसाय करण्यास मदत होईल. त्यामुळे बऱ्यापैकी आर्थिक अडचण सोडवण्यासाठी मदत होईल. हवाई प्रवास, ट्रेन आणि आंतरराज्यीय रस्ते वाहतुकीवर निर्बंध घालून सरकारनं लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवलं आहे. कोरोना व्हायरस इन्फेक्शन (ऑरेंज झोन) आणि संसर्गमुक्त भागात (ग्रीन झोन) भागांमध्ये विविध व्यावसायिक उलाढाल आणि दुकानं सुरू करण्याची सूट देण्यात आली आहे. नवीन नियमांतर्गत, रेड झोनमधील ई-कॉमर्स कंपन्या अजूनही केवळ आवश्यक वस्तू पुरवू शकतात. पण ग्रीन आणि ऑरेंज दोन्ही भागात अत्यावश्यक आणि अनावश्यक वस्तू पुरवल्या जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हीही तर या झोनमध्ये असाल तर महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करू शकता. दिल्ली आणि मुंबईसह सर्व प्रमुख शहरांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या सवलतीचा फायदा अशा शहरांमध्ये मिळणार नाही. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये ई-कॉमर्सला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. लाखो लघु व मध्यम व्यवसाय आणि व्यापारी आता व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास सक्षम असतील.’ प्रवक्त्यानं सांगितलं की, कंपनी ‘रेड झोन झोन’ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करेन. पेटीएम मॉलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीनिवास मोथे म्हणाले की, “ग्रीन आणि ऑरेंज भागात अनावश्यक वस्तूंच्या ई-कॉमर्स पुरवठ्यास सूट देऊन सरकारनं योग्य निर्णय घेतला आहे.” खरेदी करू शकता लॅपटॉप, मोबाइल फोन, कंप्यूटर हार्डवेअर सारख्या वस्तू ते म्हणाले की, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर्स आणि अगदी उन्हाळ्याचे कपडे यासारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये काही सुविधा देण्यात आल्या आहेत. घरातून काम चालू ठेवण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी लोक लॅपटॉप, मोबाईल फोन, कंप्यूटर हार्डवेअर आणि स्टेशनरी खरेदी करण्यासही उत्सुक आहेत. या चरणातून लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं देशातील 130 जिल्ह्यांना रेड झोन, 284 ऑरेंज झोन आणि 284 ग्रीन झोन अशी यादी तयार केली आहे. जिल्ह्यांचे हे वर्गीकरण 10 मेपर्यंत राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी करावे व त्यानंतर आवश्यक असल्यास आठवड्याच्या आधारे किंवा त्यापूर्वी या यादीमध्ये सुधारणा केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या