नवी दिल्ली, 4 एप्रिल : देशभरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid -19) रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 2902 जणांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली असून 24 तासांत 602 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा शोध सुरू आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाने (Health Ministry) पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या संपर्कात आल्याने 17 राज्यांतील 1023 जणांना कोरोनाची लागण झाली असून गेल्या 24 तासांत नव्या 601 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हा आकडा मोठा आहे. संबंधित - मदरस्याची जागा आयसोलेशन वार्डसाठी देणार, मौलाना हारिस दस्तगीर यांची घोषणा देशातील कोरोना पॉझटिव्ह रुग्णांमध्ये तब्बल 30 टक्के रुग्ण हे तबलिगीच्या कार्यक्रमात सहभागी किंवा सदस्यांच्या संपर्कात आल्यामुळे वाढले आहेत. याशिवाय गेल्या 24 तासांत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन तबलिगी मकरझ जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 22000 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत 9000 पासून 22000 नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर क्वारंटाइनच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.