JOIN US
मराठी बातम्या / देश / Video: मुख्यमंत्र्यांनी जिंकली सर्वांची मने, VIP कल्‍चर झुगारुन रुग्णवाहिकेला दिले स्थान

Video: मुख्यमंत्र्यांनी जिंकली सर्वांची मने, VIP कल्‍चर झुगारुन रुग्णवाहिकेला दिले स्थान

व्हिआयपी कल्‍चरचा गैरफायदा घेत अनेक नेतेमंडळी सर्वासामान्य नागरिकांवर आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतात. पण या सर्वाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) अपवाद ठरत आहेत.

जाहिरात

ambulance

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 1 नोव्हेंबर: नेते मंडळी म्हटलं की व्हिआयपी कल्‍चर हे आलेच. अनेकजण या व्हिआयपी कल्‍चरचा गैरफायदा घेताना दिसतात. सर्वासामान्य नागरिकांवर आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतात. पण या सर्वाला तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) अपवाद ठरत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन नेहमीच आपल्या खास शैलीतून सर्वांची मनं जिंकत असतात. दोन दिवसापूर्वी, त्यांनी सरकारी बसमधून प्रवास केला. त्यांच्या या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले असतानाच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी व्हिआयपी कल्‍चरला फाटा मारत सर्वसामान्यांना स्थान दिले असल्याचे पाहायला मिळत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा ताफा आज वेलाचेरीहून कोयंबेडूच्या दिशेने निघाला होता. यादरम्यान वाटेत त्यांच्या ताफ्याच्या मागे एक रुग्णवाहिका आली. मुख्यमंत्र्यांना रुग्णवाहिकेचा आवाज येताच त्यांनी ताफ्याचा वेग कमी केला आणि त्यांना बाजूला होण्यास सांगितले.

संबंधित बातम्या

स्टॅलिन यांच्या या सूचनेनंतर स्टॅलिनने बोलताच ताफ्यातील सर्व वाहनांचा वेग कमी करण्यात आला आणि रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. त्यांच्या या भूमिकेने सर्वांचे मन त्यांनी जिंकले आहे. दोन दिवसापूर्वी, त्यांनी सरकारी बसमधून प्रवास केला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्टॅलिन यांनी अचानक सरकारी बसमध्ये प्रवास केला. यावेळी त्यांना प्रवाशांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी महिला प्रवाशांकडून त्यांच्यासाठी सुरू केलेल्या मोफत प्रवास योजनेची माहिती घेतली. एमके स्टॅलिन सहाव्या मेगा लसीकरण मोहिमेत भाग घेण्यासाठी जात असताना कन्नगी नगरमध्ये बसमध्ये चढले होते. तत्पूर्वी त्यांनी अनेक लसीकरण केंद्रांचीही पाहणी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या