JOIN US
मराठी बातम्या / देश / आता बस्स झालं, DJ सुरु करण्याची परवानगी द्या; बँडवाल्यांनी वाजतगाजत काढला मोर्चा!

आता बस्स झालं, DJ सुरु करण्याची परवानगी द्या; बँडवाल्यांनी वाजतगाजत काढला मोर्चा!

‘लग्न सराईचे दिवस असलेला उन्हाळा हातचा गेला. आता सण आणि उत्सवांचे दिवस असल्याने आम्ही खायचं काय असा त्यांचा सवाल आहे.’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राजनांदगांव 21 ऑगस्ट: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातल्या उद्योग धद्यांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही व्यवसायांसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र अजुनही काही व्यवसायांवर बंदी कायम आहे. त्यातलाच एक व्यवसाय म्हणजे बँड. लग्न समारंभ आणि इतर उत्सवांची सुरुवात ज्यांच्यापासून होते ती ही मंडळी सध्या बेरोजगार झाली आहे. त्यामुळे आम्हाला काम करण्याची परवानगी द्या या मागणीसाठी छत्तीसगडमधल्या राजनांदगावमध्ये आज बँडवाल्या लोकांनी वाजतगाजत मोर्चा काढला. त्यांच्या या मोर्चाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. गेल्या पाच महिन्यांपासून ही मंडळी घरीच बसून आहेत. काम नसल्याने मिळकत नाही त्यामुळे घर कसं चालवायचं असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. लग्न सराईचे दिवस असलेला उन्हाळा हातचा गेला. आता सणांच्या दिवसांमध्ये या मंडळींना सर्वात जास्त काम असते. गौरी-गणपती, नवरात्र, ते दिवाळीपर्यंत यांचा हंगाम असतो. तोही जर गेला तर मग करायचं काय असा या हजारो लोकांसमोर प्रश्न आहे.

त्यामुळे आम्हाला कामाची परवानगी द्या  अशी त्यांची मागणी आहे. आम्ही सर्व नियमांचं पालन करण्यास तयार असल्याचंही त्यांच्या संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्या वाद्यांसह अनोखा मोर्चा काढून सरकार आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या