JOIN US
मराठी बातम्या / देश / Mann Ki Baat LIVE: भारतावर नजर टाकणाऱ्यांना मिळणार चोख उत्तर - नरेंद्र मोदी

Mann Ki Baat LIVE: भारतावर नजर टाकणाऱ्यांना मिळणार चोख उत्तर - नरेंद्र मोदी

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.

जाहिरात

New Delhi: Prime Minister Narendra Modi addresses the nation on COVID-19 via a video link, in New Delhi, Tuesday, April 14, 2020. PM Modi announced extension of the ongoing lockdown till May 3.(PIB/PTI Photo)(PTI14-04-2020_000210B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना एकूण परिस्थितीवर आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित करत आहेत. पीएम मोदींचा हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केला जातो. मोदी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक महिन्यात मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत असतात. यावेळी ते या संवादातून कोरोना आणि भारत-चीन वादावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मधील मुद्दे - कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जागतीक पातळीवर बर्‍याच गोष्टी घडल्या आहेत, 2020 कसं जाणार याबद्दल सगळे लोक चर्चा करत आहेत. - देशात चक्रीवादळ, टोळ धाडमुळे अनेकांवर संकटं आली. अनेक भूकंपही झाले आहेत. इतर देश ज्या संकटांचा सामना करत आहेत. ती संकटं आपल्या देशावरही आहेत. - आव्हानं ही येतच राहतात. एक आव्हान एका वर्षात येतं किंवा 50 आव्हानं ही एका वर्षात येतात. भारताचा इतिहास आव्हानांनी भरलेला आहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायलं गाणं - यह कलकल छलछल बहती क्या कहती गंगा धारा, सदियों से बहती यह पुण्य प्रताप हमारा - पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये चिनी भारतीय सैनिकांच्या चकमकीचा उल्लेखही केला. जर भारताला मैत्री जपणं आणि चोख उत्तर देणं माहित आहे. - विना मास्क घराबाहेर पडला तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला धोक्यात घालत आहात. - देश अनलॉक होत असल्यामुळे आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. तरच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोरोनापासून होणाऱ्या संसर्गापासून वाचवता येईल. - यावर्षी देश नवीन उद्दिष्टे साध्य करणार आहे. इतकंच नाही तर देश नवीन उड्डाण घेईल आणि मोठी प्रगती करेल - सीमेचं रक्षण करण्यासाठी, देशाचं सामर्थ्य वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरून देश अधिक सक्षम होईल. देश स्वावलंबी झाला पाहिजे - ही आपल्या शहीदांना खरी श्रद्धांजली ठरेल - या लॉकडाऊनमुळे अनेकांना त्यांचं बालपण पुन्हा मिळालं आहे. काहींना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवले असतील. मी म्हणेन की तुम्ही ते दिवस का विसरलात? त्या खेळांना का विसरलात? - कोरोनाच्या काळात आपल्याला आजारांपासून दूर रहावं लागणार आहे. आयुर्वेदिक औषधं, काढा, गरम पाणी, त्यांचा वापर करत रहा आणि निरोगी रहा.

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. मागील ‘मन की बात’ मध्ये पीएम मोदी टोळ हल्ला, बंगाल आणि ओडिशामधील सुपर चक्रीवादळ अम्फान, कोरोना व्हायरस यासह अनेक मुद्द्यांवर बोलले होते. कोरोना ही एक आपत्ती आहे ज्याचा संपूर्ण जगात कोणताही इलाज नाही. यामुळे याकडे प्रत्येकाला काळजीपूर्वक पाऊलं उचलावी लागली. देश प्रत्येक नागरिकाच्या सोबत खंबीर उभा असल्याचं मोदी म्हणाले होते. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या