JOIN US
मराठी बातम्या / देश / उत्तरप्रदेशातील यमुना Expressway वर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये पुण्यातील चौघांचा समावेश

उत्तरप्रदेशातील यमुना Expressway वर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये पुण्यातील चौघांचा समावेश

उत्तरप्रदेशातील यमुना एक्सप्रेस वे वर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यापैकी चौघे हे पुण्यातील निवासी आहेत.

जाहिरात

उत्तरप्रदेशात यमुना एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, पुण्यातील चौघांचा जागीच मृत्यू

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आग्रा, 12 मे : उत्तरप्रदेशात यमुना एक्सप्रेस वे वर एक भीषण (major accident on Yamuna Expressway in UP) अपघात झाला आहे. आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर प्रवासी जखमी झाले आहेत. आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो आणि डम्पर यांच्यात धडक (Bolero and dumper collied each other) झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो गाडीतील सात पैकी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात एक्सप्रेस वे वरील 40 किमी माइलस्टोन जवळ झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या पाच पैकी चौघेजण हे महाराष्ट्रातील निवासी आहेत. तर अपघातात दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतकांची नावे चंद्रकांत नारायण बुराडे (वय 68 वर्षे) - बारामती, पुणे स्वर्णा चंद्रकांत बुराडे (वय 59 वर्षे) - बारामती, पुणे मालन विश्वनाथ कुंभार (वय 68 वर्षे) - बारामती, पुणे रंजना भरत पवार (वय 60 वर्षे) मराठा नगर, बारामती, पुणे नुवंजन मुजावर (वय 53 वर्षे) बेळगाव, चिकोडी कर्नाटक वाचा :  संभाजीराजे पत्रकार परिषदेत काय करणार घोषणा? मोठी अपडेट आली समोर जखमींची नावे नारायण रामचंद्र कोळेकर (वय 40 वर्षे) फलटण, सातारा सुनीता राजू गस्ते (वय 35 वर्षे) बेळगाव या अपघातानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ योग्य ते उपचार देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. वाचा :  चालत्या ट्रेनमधून कोसळली महिला; रेल्वेखाली जाणार इतक्यात अवतरला ‘देवदूत’, Shocking Video मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो गाडीत एकूण सात प्रवासी प्रवास करत होते. हे सर्वजण आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जात होते. बोलेरो गाडी जेवर टोल प्लाझापासून काही अंतरावर होती त्याच वेळी भारधाव गाडी समोरील डंपरला पाठीमागून जोरदार धडकली. गाडी इतकी वेगाने होती की, बोलेरो गाडी थेट डंबरच्या पाठीमागील भागात शिरली. या अपगातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या